चंद्रपूर, काजीपेठसाठी नवी सुपरफास्ट रेल्वे, प्रवाशांना होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:59 AM2017-10-20T02:59:32+5:302017-10-20T02:59:51+5:30
एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे आपल्या घरी जाऊ न शकलेल्या चंद्रपूर व विदर्भातील प्रवाशांना नवी साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू झाली असून...
पुणे : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे आपल्या घरी जाऊ न शकलेल्या चंद्रपूर व विदर्भातील प्रवाशांना नवी साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू झाली असून, ती पुण्यातून शुक्रवारी रात्री २१़४५ वाजता रवाना होत आहे़ ती चंद्रपूरला शनिवारी दुपारी १३़३७ वाजता पोहोचेल़
पुण्यात नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्यांना एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे आपल्या गावी जाणे शक्य झाले नाही़ त्यांना आता नवी रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे़ पुणे ते काजीपेठ ही (२२१५१) साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वे दर शुक्रवारी पुण्यातून रात्री २१़४५ वाजता सुटेल़ ती चंद्रपूरला दुसºया दिवशी १३़२२ वाजता पोहोचेल व तेथून सायंकाळी १८.३५ वाजता काजीपेठला पोहोचेल़ ही गाडी (२२१५२) दर रविवारी दुपारी १३़३५ वाजता काजीपेठहून पुण्याला निघेल़ ही गाडी सायंकाळी १७़५० ला चंद्रपूरला पोहोचेल़ सोमवारी सकाळी ११़०५ मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे़ ही गाडी दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, फुलगाव, वर्धा वरोरा, चंद्रपूर, बल्हाळशहा, शिरपूर, रामागुंडम, पेडापल्ली, काजीपेठ येथे थांबणार आहे़
पुणे रेल्वे विभाग अंधारातच
पुण्याहून एखादी गाडी सुरू होत असेल, तर त्याची किमान चार ते पाच दिवस अगोदर प्रवाशांना माहिती दिली जाणे आवश्यक आहे़ या दिवाळीसारख्या दिवसांमध्ये ही गाडी सुरू होत आहे़ त्यात एसटी कर्मचाºयांचा संप असल्याने प्रवाशांना अशा रेल्वेची गरजच होती़ परंतु, त्याची काहीही माहिती गुरुवारी दुपारपर्यंत या गाडीविषयी कोणीही माहिती देऊ शकत नव्हते़ या गाडीची कोणतीही पूर्वप्रसिद्ध करण्यात आली नाही़
पुणे ते काजीपेठ ही नवी साप्ताहिक सुपरफास्ट गाडी सुरू केल्याने चंद्रपूर, शिरपूर, काजीपेठ या औद्योगिक पट्ट्यात जाणाºया प्रवाशांना सोयीचे झाले आहे़ पुण्याहून चंद्रपूरला जाण्यासाठी प्रवाशांना वर्धा येथे उतरून मग तेथून चंद्रपूरला जाणे त्रासदायक आहे़ तसेच, चंद्रपूरजवळ भांडूक येथे जैन तीर्थक्षेत्र आहे़ यामुळे या गाडीला मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळू शकतील़ त्यामुळे रेल्वेने ही गाडी दररोज सोडावी़
- हर्षा शहा, पुणे प्रवासी गु्रप