महात्मा फुलेंच्या त्यागामुळेच परिवर्तन : रत्नाकर मखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:24+5:302021-04-12T04:10:24+5:30
महात्मा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल (जिजाऊनगर) इंदापूर येथील भीमाई आश्रमशाळेत राष्ट्रपिता महात्मा जोतिबा ...
महात्मा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल (जिजाऊनगर) इंदापूर येथील भीमाई आश्रमशाळेत राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुलेंची जयंती शासनाचे नियम पाळत संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. यावेळी मखरे बोलत होते. मुख्याध्यापक साहेबराव पवार म्हणाले की, महात्मा फुलेंच्या कार्यातून धडा घेत शिक्षण हाच यशाचा मूलमंत्र आहे. मनीषा मखरे म्हणाल्या, महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्याला फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे- मखरे व संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महात्मा फुलेंना अभिवादन करताना.