सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ''सायन्स पार्क '' चे रूपडे पालटणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:59 PM2019-04-03T19:59:06+5:302019-04-03T20:07:20+5:30

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, उत्सुकता आणखी वाढवणे आणि नागरिकांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा उलगडा करून देणे या उद्देशाने पुणे विद्यापीठात पाच वर्षांपूर्वी सायन्स पार्कची स्थापना केली.

change the face of science park in Savitribai Phule University of Pune | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ''सायन्स पार्क '' चे रूपडे पालटणार  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ''सायन्स पार्क '' चे रूपडे पालटणार  

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशस्त दुमजली इमारतीमध्ये स्थलांतरपुण्यातील सर्वांत मोठे सायन्स पार्क, संग्रहालय, शिवाय प्रयोग करण्याची व्यवस्थासुद्धा असणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्क लवकरच नव्या इमारतीत स्थलांतर होणार आहे. तिथे अनेक मोठ्या आकाराच्या प्रतिकृती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर इथल्या प्रयोगशाळेत मुक्तपणे वेगवेगळया प्रकारचे प्रयोग करता येणार आहेत. हे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील पहिलेच सायन्स पार्क असून याचे रूपडे पालटणार आहे. 
सायन्स पार्कसाठी १५ हजार चौरस फुटांचे क्षेत्रफळ असलेली स्वतंत्र दुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू असून, येत्या ऑक्टोबरपर्यंत या नवीन ठिकाणी सायन्स पार्कचे स्थलांतर होणार आहे, अशी माहिती सायन्स पार्कचे संचालक डॉ. डी. जी. कान्हेरे आणि वरिष्ठ संशोधक डॉ. हर्षदा बाबरेकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, उत्सुकता आणखी वाढवणे आणि नागरिकांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा उलगडा करून देणे या उद्देशाने पुणे विद्यापीठात पाच वर्षांपूर्वी सायन्स पार्कची स्थापना केली. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नवीन इमारतीमध्ये विज्ञानविषयक मोठ्या प्रतिकृती ठेवता येणार आहेत. त्यात मुलांना पाहता येतील, खेळता येतील अशी-डीएनएचे ८ फुटी प्रतिकृती, वाळवीचे पाच फूट उंचीचे घर व त्याची अंतर्गत रचना, १० फूट उंचीचे बोलका वृक्ष, आठ फूट उंचीचा लाकडी सूक्ष्मदर्शकाची (मायक्रोस्पोक) प्रतिकृती अशा गोष्टी ठेवणार आहेत.
पुण्यातील सर्वांत मोठे सायन्स पार्क असेल, त्यात संग्रहालय तर असेलच, शिवाय प्रयोग करण्याची व्यवस्थासुद्धा असणार आहे. नव्या जागेचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे प्रयोग प्रदर्शित करणे शक्य आहे. याशिवाय विविध परिसंस्थांच्या संवादी प्रतिकृती मॉडेल तयार करता येतील. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील, असेही डॉ. डी. जी. कान्हेरे यांनी सांगितले.
.....................
विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजन
सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी २० आठवडयांचे हॅन्ड्स ऑनट्रेनिंग घेतले जाते. त्यासाठी विद्यार्थी आठवडयातून एकदा सायन्स पार्कमध्ये येतात आणि प्रयोग करत विज्ञान समजून घेतात. त्यात तिन्ही बोर्डांच्या (राज्य बोर्ड, केंद्रीय बोर्ड, इंचरनॅशनल बोर्ड) शाळेतील अभ्यासक्रमावर आधारित प्रयोग करून घेतले जातात. त्यात विविध विषयांवरील प्रयोग हाती घेतले जातात. 
सायन्स पार्कमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार
सायन्स पार्कमध्ये नेमके काय पाहायला मिळणार
- माणसाचा बोलता सापळा. तो शरीरातील हाडांची माहिती देतो.
- पोटातील अन्नाचा प्रवास, श्वासोच्छवासाची प्रक्रिया, आदींच्या प्रतिकृती.
- चरख्यापासून वीजनिर्मिती मॉडेल.
- स्वत:चा आवाज पाहण्याचे मॉडेल.
- तबला, एकतारा कसे काम करतात याचे सिग्नल छोट्या टीव्ही स्क्रीनवर (ऑसिलोस्कोप) दाखवतात.
- ढगांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या वीजेचे मॉडेल.
- वेगवेगळ्या कोनांमध्ये ठेवलेले आरशांमध्ये किती प्रतिमा दिसतात.

Web Title: change the face of science park in Savitribai Phule University of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.