पुण्यातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रकात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:09 PM2022-07-06T18:09:56+5:302022-07-06T18:27:09+5:30

एकादशी आणि बकरी ईदमुळे या नियोजनात बदल

Change in one day water supply schedule in Pune know the details | पुण्यातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रकात बदल

पुण्यातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रकात बदल

googlenewsNext

पुणे :पुणे महानगरपालिकेमार्फत पुणे शहरात दि. ४ ते ११जुलैपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण येत्या आठवड्यातील एकादशी आणि बकरी ईदमुळे या नियोजनात थोडा बदल पालिकेने  केले आहे.

१० जुलैला आषाढी एकादशी तसेच बकरी ईद हे सण असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दि. ०८/०७/२०२२ ते ११/०७/२०२२ पर्यंत पूर्वी प्रमाणे दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच ११ जुलैनंतरचे नियोजन त्यावेळी करण्यात येणार असल्याची  माहिती पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. 

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील कमी साठ्यांमुळे पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. पण येत्या काही दिवसांतील सण पाहता हा या निर्णयात पालिकेने बदल केला आहे. सकारात्मक बाब म्हणजे पुढील चार दिवस चांगला पाऊस सांगितला आहे. जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला तर भविष्यात पुणेकरांना पुन्हा सुरळीत पाणी पूरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: Change in one day water supply schedule in Pune know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.