Pune Metro च्या वेळापत्रकात बदल; सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धावणार, जाणून घ्या बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:50 PM2023-08-14T21:50:19+5:302023-08-14T21:55:01+5:30

मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी १ तास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला ...

Change in Pune Metro timetable; It will run from 6 am to 10 pm, know the changes | Pune Metro च्या वेळापत्रकात बदल; सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धावणार, जाणून घ्या बदल

Pune Metro च्या वेळापत्रकात बदल; सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धावणार, जाणून घ्या बदल

googlenewsNext

पुणे : शहरातील महामेट्रो आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी १ तास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी ७ ते रात्री १० अशीच सुरू असणार आहे.

पुणे मेट्रोची वारंवारिता पुढीलप्रमाणे असेल...

वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग

सकाळी ६ ते ८ : दर १५ मिनिटांनी

सकाळी ८ ते ११ : दर १० मिनिटांनी

सकाळी ११ ते दुपारी ४ : दर १५ मिनिटांनी

दुपारी ४ ते रात्री ८ : दर १० मिनिटांनी

रात्री ८ ते १० : दर १५ मिनिटांनी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग

सकाळी ७ ते ८ : दर १५ मिनिटांनी

सकाळी ८ ते ११ : दर १० मिनिटांनी

सकाळी ११ ते दुपारी ४ : दर १५ मिनिटांनी

दुपारी ४ ते रात्री ८ : दर १० मिनिटांनी

रात्री ८ ते १० : दर १५ मिनिटांनी

Web Title: Change in Pune Metro timetable; It will run from 6 am to 10 pm, know the changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.