Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 10:40 AM2024-12-10T10:40:32+5:302024-12-10T10:40:39+5:30

लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिनाच्या दिवशी वॉकिंग प्लाझा करण्यात आला असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या बसमारंगात काळात बदल करण्यात आला आहे

Change in the route of pmpml on Lakshmi Street on the occasion of Pedestrian Day | Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल

Pune Pedestrian Day 2024: पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील ‘पीएमपी’च्या मार्गात बदल

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी (दि. ११) डिसेंबर रोजी पादचारी दिनाच्या दिवशी वॉकिंग प्लाझामुळे उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या काळात बदल करण्यात आला आहे. महापालिकेकडून पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझाचे आयोजन केले जाते. हा रस्ता ‘नो व्हेईकल झोन’ केला झाते. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून नियमितपणे धावणाऱ्या बसच्या मार्गात बदल केला जाणार आहे.

असा आहे मार्गात बदल...

- बस मार्ग क्रमांक ५५, ५८, ५९ हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, टिळक चौकातून पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
- बस मार्ग क्रमांक ५७ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून जाताना केळकर रस्ता, नारायण पेठ मार्गे टिळक चौक मार्गाने संचलनात राहतील.
३) अटल पुण्यदशमचे बस मार्ग क्रमांक सात व नऊ तसेच बस मार्ग क्रमांक ८१, १४४, १४४अ, १४४क व २८३ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने संचलनात राहतील.
४) बस मार्ग क्रमांक १७४ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अप्पा बळवंत चौकच्या पुढे केळकर रस्ता मार्गाने नारायणपेठ, टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
५) बस मार्ग क्रमांक १९७ व २०२ या मार्गावरील बस हडपसरकडून कोथरूड डेपो/वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अप्पा बळवंत चौकच्या पुढे केळकर रस्ता मार्गाने नारायण पेठमार्गे टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील, तसेच कोथरूड डेपो/वारजे माळवाडीकडून हडपसरकडे येताना मार्गावरील बस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
६) बस मार्ग क्रमांक ६८ या मार्गावरील बस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदराकडे येताना टिळक रस्ता मार्गे संचलनात राहतील.

Web Title: Change in the route of pmpml on Lakshmi Street on the occasion of Pedestrian Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.