जीएसटीनुसार व्यापारपद्धती बदला

By admin | Published: May 29, 2017 03:18 AM2017-05-29T03:18:04+5:302017-05-29T03:18:04+5:30

जीएसटी लागू होण्याआधी आपली व्यापारपद्धती नियम व अटींनुसार बदल्यास व सर्व कागदपत्रे अपटेड करून घेतल्यास जीएसटी

Change the trading pattern according to GST | जीएसटीनुसार व्यापारपद्धती बदला

जीएसटीनुसार व्यापारपद्धती बदला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जीएसटी लागू होण्याआधी आपली व्यापारपद्धती नियम व अटींनुसार बदल्यास व सर्व कागदपत्रे अपटेड करून घेतल्यास जीएसटी करप्रणाली अवघड न वाटता तिचा फायदाच होईल, असे विक्रीकर विभागाचे सहआयुक्त सुमरकुमार काळे यांनी सांगितले़
जीतो पुणे शाखेच्या वतीने जीएसटीवरील कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते़ लेखापाल पीयूष छाजेड, सुहास बोरा, जीतो पुणे शाखेचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव नरेंद्र छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.
वस्तू व सेवाकर नेमका काय आहे? त्याची तत्त्वे, वैशिष्ट्ये कोणती आहेत? सध्याची करप्रणाली व लागू होणारी करप्रणाली यामधील फरक, वस्तू व सेवांच्या किमतीत होणाऱ्या फरकांच्या नियम व अटी याबाबत काळे यांनी माहिती दिली.

Web Title: Change the trading pattern according to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.