हमीभावाचे धोरण बदला; निर्यातीसाठी सवलत द्या, विघ्नहरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; जीएसटीमुळे महागाई वाढत चाललीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:03 AM2017-10-26T01:03:26+5:302017-10-26T01:03:28+5:30

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.

Change the war strategy; Exemption for export; Launch of the breakdown of Wingerhorn; GST raises inflation | हमीभावाचे धोरण बदला; निर्यातीसाठी सवलत द्या, विघ्नहरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; जीएसटीमुळे महागाई वाढत चाललीय

हमीभावाचे धोरण बदला; निर्यातीसाठी सवलत द्या, विघ्नहरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; जीएसटीमुळे महागाई वाढत चाललीय

Next

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सदोष जीएसटी प्रणालीमुळे महागाई वाढलेली आहे. कर्जमाफीचा शेतक-यांना फायदा झालेला नाही, अशी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करून हमीभावाचे धोरण बदलले पाहिजे, निर्यातीसाठी सवलत दिली पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३२व्या गळीत हंगामचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन घोलप, सुमित्राताई शेरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवके वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड़ संजय काळे, जि़ प़ गटनेत्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, कारखान्याचे सर्व संचालक, शेतकरी, सभासद, विविध गावांचे सरपंच, कारखान्याचे अधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते़
पवार म्हणाले, की जीएसटी प्रणाली सदोष आहे. दुधावर जीएसटी नाही; परंतु दुधावर असलेल्या प्रॉडक्टवर जीएसटी लागू केल्याने दरवाढ झाली आहे. जीएसटीमुळे महागाई वाढत चालली आहे़ अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याने सर्वसामान्य शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. कारखान्यांना निर्यातीसाठी सवलती दिल्या पाहिजेत. निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले, तरच शेतकरी टिकेल़ शेती व शेतकºयांची परस्थिती बदलली पाहिजे. यासाठी किंमत व धोरण बदलेले पाहिजे़ भविष्यात सामुदायिक शेती ही काळाची गरज आहे़
विघ्नहर कारखाना उत्तमरीत्या सुरू आहे़ या वर्षी उसाचे टनेज वाढणार असल्याने गळिताची जबाबदारी विघ्नहरने घ्यावी़ यापुढेही काटकसरीने कारखाना चालवावा, असा सल्ला पवार यांनी या वेळी दिला़
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की शेतकरी जगला तरच देश पुढे जाईल़ मोदींनी शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले; मात्र ते पाळण्यात आलेले नाही़ शेतकºयांना कर्जमाफी नाही, हमीभाव नाही, कर्जमाफीसाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पूर्वीचे सरकार असताना अडचणी होत्या़ आत्ताचे सरकार असूनही अडचणी आहेत़ आम्ही सत्तेत आहोत किंवा नाही हे माहीत नाही; परंतु हे सरकार शेतकºयांचे नाही़, अशी टीका अध्यक्षीय भाषणात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली. त्यांनी बैलगाडा शर्यती जिव्हाळ्याचा विषय असून त्याबाबत कायदा होऊनदेखील अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
शरद पवार हे रयतेचे राजे असून दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असे गौरवोद्गार आमदार शरद सोनवणे यांनी या वेळी काढले.
चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी सूत्रसंचालन केले़ कारखान्याचे व्हा़ चेअरमन अशोक घोलप यांनी आभार मानले़

Web Title: Change the war strategy; Exemption for export; Launch of the breakdown of Wingerhorn; GST raises inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.