बारामतीत फेरफार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:43+5:302021-07-30T04:09:43+5:30
सांगवी : बारामती तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी फेरफार अदालती घेण्यास सुरुवात ...
सांगवी : बारामती तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी फेरफार अदालती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार अदालतीमध्ये ज्या कोणाच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयात उपस्थित राहून मंडल अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन फेरफार अदालती सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या वारस तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बुधवारी फेरफार अदालातीचे आयोजन करण्यात आले होते. दि.२६ जुलै अखेर मुदत पूर्ण झालेल्या १२ हजार ५२७ नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गत करण्यात येणार आहेत. यावेळी मळद येथील तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी स्वाती गायकवाड, खांडजचे तलाठी वैभव टकले, नीरावागजचे तलाठी संजय खाडे, मळद-मेखळीच्या तलाठी कांता देशमुखे, शिरवलीच्या तलाठी विद्या जगताप यांनी कामकाज पाहिले.
मळद येथे फेरफार अदालत दरम्यान स्वाती गायकवाड, तलाठी व ग्रामस्थ.
२९०७२०२१-बारामती-०३