दुष्काळी ‘पडवी’चे पालटले रूप
By admin | Published: January 9, 2017 02:13 AM2017-01-09T02:13:23+5:302017-01-09T02:13:23+5:30
पडवी गावाची दुष्काळी गाव म्हणून ओळख होती. मात्र सध्या जलसंधारणामधील झालेली मोठ्या कामांमुळे व ओढा
वरवंड : पडवी गावाची दुष्काळी गाव म्हणून ओळख होती. मात्र सध्या जलसंधारणामधील झालेली मोठ्या कामांमुळे व ओढा खोलीकरणामुळे सध्या तरी पाण्याची स्थिती काही चांगली असल्याचे दिसत आहे.
पडवी येथील गायकवाड मळ्यामध्ये जलसंधारणमधून ओढा खोलीकरण करण्यात आले होते. पडवीमध्ये म्हणावी तशी
पावसाने हजेरी लावली नसल्याने केलेले काम वाया जाते काय, असे वाटत असताना या गावातील बंधारे जानाई शिरसाईमधून भरून घेण्यात आले.
मात्र, गायकवाड मळ्यातील बंधाऱ्यामध्ये मात्र जानाई सिरसाईचे पाणी पोहोचत नसल्यामुळे तो बंधारा भरणार कसा, असा प्रश्न
पडत असताना मात्र सुपे घाट परिसरात झालेल्या पावसामुळे गायकवाड मळ्यातील बंधाऱ्यामध्ये आजतागायत पाणी साचलेले दिसत आहे.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पिण्याचा पाण्यासाठी टँकरच्या मागणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
बंधाऱ्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाण्याचा तरी प्रश्न मार्गी लागला असल्याचे शेतकरी शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.
मागील वर्षी जानेवारीमध्ये पिण्याचा पाण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तसेच या ओढा खोलीकरणासाठी व बंधाऱ्यासाठी आमदार राहुल कुल व आमदार माधुरी मिसाळ तसेच
जिल्हा परिषद सदस्या वैशाली वाबळे यांच्या फंडातून मोठी कामे करण्यात आली आहे. (वार्ताहर)