JEE Exam | जेईई हॉटेल मॅनेजमेंट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:03 IST2022-03-23T12:59:57+5:302022-03-23T13:03:27+5:30
'एनटीए'ने परीक्षेच्या तारखेत बदल केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

JEE Exam | जेईई हॉटेल मॅनेजमेंट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी एनसीएचएम जेईई परीक्षा आणि सीबीएसई बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. मात्र, 'एनटीए'ने परीक्षेच्या तारखेत बदल केल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
'एनटीएतर्फे २८ मे रोजी एनसीएचएम जेईई परीक्षा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. परिणामी हॉटेल मैनेजमेंट अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे जेईई परीक्षेच्या कालावधीत बदल करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार येत्या २८ मे रोजी होणारी जेईई परीक्षा आता १८ जून रोजी घेतली जाणार आहे.