गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 12:25 PM2023-09-17T12:25:28+5:302023-09-17T12:25:45+5:30

शहरात अनेक भागात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार

Changes in traffic on the occasion of Ganaraya's arrival; Use 'these' alternative roads | गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा

गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा

googlenewsNext

पुणे: सार्वजनिक मंडळांसह घरगुती स्तरावरही येत्या साेमवारी व मंगळवारी (दि. १८ आणि १९) गणेशाची प्रतिष्ठापना हाेणार आहे. त्यासाठी बाजारात गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी नागरिक या दिवशी सकाळी सहापासून ते रात्री १२ पर्यंत माेठी गर्दी करतात. त्यामुळे वाहतूककाेंडी हाेऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केला आहे.

यंदा गणेशमूर्ती विक्रीचे बहुसंख्य स्टॉल हे डेंगळे पूल ते शिवाजी पुलादरम्यान श्रमिक भवनसमोर (अण्णा भाऊ साठे चौक) व कसबा पेठ पोलिस चौकी ते जिजामाता चौक ते मंडई तसेच सावरकर पुतळा ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) पर्यंत आहेत. या परिसरातील नागरिकांची गैरसोय तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालण्यासाठी पुढीलप्रमाणे बदल केले आहेत :

- हे दाेन दिवस शिवाजी रोड गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैया चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. त्याला पर्यायी मार्ग हा गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन संताजी घोरपडे पथावरून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.

- शिवाजीनगरकडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण न घेता सरळ जंगली महाराज रोडने जावे.
- झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळे पूलमार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खुडे चौकामधून म.न.पा. पुणेसमोरून मंगला सिनेमा लेनमधून कुंभारवेस किंवा प्रीमिअर गॅरेज चौक शिवाजी पूल मार्गे जावे.

वाहतूक सुरू असलेले रस्ते 

- फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज
- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
- मंगला टॉकीजसमोरील प्रीमिअर गॅरेज लेनमधून कुंभार वेस सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) गणपती विक्रीदरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू राहील, परंतु या टप्प्यामध्ये वाहने पार्क करू नये.

पार्किंग व्यवस्था

- मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्यंत.- जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूला
- निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन
- न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा या दरम्यान रस्त्याचे कोर्टाकडील एका बाजूस.
- वीर संताजी घोरपडे पथावर म.न.पा. बिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याच्या दक्षिण बाजूस
- टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर
- मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळावर
- शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक, फक्त रस्त्याचे डाव्या बाजूस.

 

Web Title: Changes in traffic on the occasion of Ganaraya's arrival; Use 'these' alternative roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.