वैद्यकीय अभ्यासक्रमांत होणार बदल
By admin | Published: October 10, 2015 04:59 AM2015-10-10T04:59:41+5:302015-10-10T04:59:41+5:30
वैद्यकीय व्यवसायामध्ये काळानुरूपबदल करणे आवश्यक असल्याने इंडियन मेडिकल कौन्सिलने पदवी अभ्यासक्रमांमध्येही संशोधन पध्दतीचा समावेश करण्याचा
पुणे : वैद्यकीय व्यवसायामध्ये काळानुरूपबदल करणे आवश्यक असल्याने इंडियन मेडिकल कौन्सिलने पदवी अभ्यासक्रमांमध्येही संशोधन पध्दतीचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कौन्सिलच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मेहता यांनी शुक्रवारी येथे दिली.
भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉलेज आॅफ सर्जनच्या (आयसीएस) वार्षिक परिषदेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, आयसीएसचे अध्यक्ष प्रोफेसर जमीर पाशा, सचिव प्रोफेसर सिद्धार्थ दुभाषी, प्राचार्य डॉ. विवेक सावजी, ब्रिगेडीअर डॉ. सी. एस. जोशी, डॉ. सुहास तार्लेकर, डॉ. एस. रघुपती आदी उपस्थित होते. संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणारा अंकगणिताचाही (स्टॅटेस्टिक्स) भागही या पुढे मेडिकलच्या अभ्यासक्रमांचा एक भाग बनणार असल्याचे सांगून डॉ. मेहता म्हणाल्या, ह्यकौन्सिलने वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये महत्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. वैद्यकीय व्यवसायामध्येही काळानुरुप बदल होणे गरजेचे आहे. त्यानुसार हे बदल असतील. मानसिक आरोग्य, लैंगिक तक्रारी, लिंगसमभावाबद्दलची जाणीव निर्माण करणे आणि संशोधन याचा त्यात समावेश आहे. भारतीय समाजाच्या अडचणींवर मात करू शकणारे वैद्यकीय संशोधन पुढे आणण्यासाठी कौन्सिल प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. शिवाजीराव कदम यांनी यावेळी विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली.