पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीत बदल; आता संचारबंदी नव्हे तर जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 10:18 AM2020-12-26T10:18:25+5:302020-12-26T10:20:48+5:30

महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांकडून अंशत: बदल

Changes in night curfew in Pune | पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीत बदल; आता संचारबंदी नव्हे तर जमावबंदी

पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीत बदल; आता संचारबंदी नव्हे तर जमावबंदी

googlenewsNext

पुणे : राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला असून आता रात्री संचारबंदी लागू राहणार नसून जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवा तसेच वस्तू यांना यातून सवलत देण्यात आली आहे. 

सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार ५ जानेवारीपर्यंत दररोज रात्री २३ ते दुसरे दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यात ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येण्यास व फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. 

याअगोदर २२ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारास मनाई करण्यात आली होती. त्यात आता बदल करुन लोकांना जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Changes in night curfew in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.