विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 07:00 AM2019-09-11T07:00:00+5:302019-09-11T07:00:07+5:30

मिरवणुकीमुळे दि. १२ सप्टेंबर रोजी काही रस्ते बंद असल्याने या मार्गावरून बस संचलन बंद ठेवणार आहे.

Changes in "PMP" operation on Immersion Day | विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार

विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार

Next
ठळक मुद्देडेक्कनकडून टिळक चौकातून जाणाऱ्या बस बंदच राहणार संचलन सायंकाळनंतर एसएनडीटी चौकातून सुरू करणार शहराच्या मध्यभागातून जाणारे काही मार्ग बंद ठेवणार

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून शहरातील बस संचलनामध्ये बदल केला आहे. मिरवणुकीमुळे १२ सप्टेंबर रोजी काही रस्ते बंद करणार असल्याने या मार्गावरून बस संचलन बंद ठेवणार आहे. तसेच काही बसस्थानकांवरील संचलनही बंद ठेवणार आहे. 
विसर्जन मिरवणुकीमुळे लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता हे प्रमुख सकाळपासूनच वाहतुकीला बंद करण्यात येतात. त्यामुळे या रस्त्यावरील बस वाहतुक मिरवणूक संपेपर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता व लाल बहाद्दुर शास्त्री रस्ता हे रस्तेही टप्याटप्याने बंद केले जातात. त्यानुसार या मार्गावरील वाहतुक बंद करणार आहे.

डेक्कनकडून टिळक चौकातून जाणाऱ्या बस बंदच राहणार आहे. डेक्कन बसस्थानक बंद ठेवणार असून त्याऐवजी खंडोजी बाबा चौकातून बस संचलन सुरू राहील. हे संचलन सायंकाळनंतर एसएनडीटी चौकातून सुरू करणार आहे. खंडोजी बाबा चौकातून कर्वे रस्ता, म्हात्रे फुल, सिंहगड रस्ता या मार्गे बस स्वारगेट व कात्रजच्या दिशेने जातील. तसेच पुणे स्टेशनहून येणाऱ्या बस नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे वळविल्या जातील. शहराच्या मध्यभागातून जाणारे काही मार्ग बंद ठेवणार आहेत. स्वारगेट येथून होणारे पीएमपीचे संचलन बंद ठेवणार आहे. त्याऐवजी चार ठिकाणांहून बस सोडण्यात येतील.
--
विसर्जन मिरवणुकीदिवशीचे नियोजन
तात्पुरते स्थानक                                                     मार्ग
लक्ष्मी नारायण चौक                                        सातारा रस्त्याने कात्रज, मार्केटयार्ड
पर्वती पायथा  बस थांबा                                     सिंहगड रस्त्याने जाण्यासाठी
वेगा सेंटर (स्वारगेट आगाराजवळ)               सोलापूरमार्गे पुलगेट, हडपसर, कोंढवासाठी
वेगा सेंटर (स्वारगेट आगाराजवळ)               भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठसाठी
खंडोजी बाबा चौक                                       कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, कोंढवा गेट, गोखलेनगरसाठी
मनपा भवन मुख्य बसस्थानक                   भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, विश्रांतवाडी, पाषाण, बालेवाडी,                                                                      सांगवी, पिंपळे गुरव, तळेगाव दाभाडे, प्राधिकरण
काँग्रेस भवन बसस्थानक                            कर्वेनगर, माळवाडी, कोंढवा गेट, कोथरुड डेपो
मनपा नदीकाठी बसस्थानक                     बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी
डेंगळे पुल स्थानक                                   लोहगाव, वडगाव शेरी, मुंढवा गाव, केशवनगर
--
- लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता-सकाळपासूनच संचलन बंद
- टिळक रस्ता, लाल बहाद्दुर शास्त्री रस्ता-टप्प्याटप्याने संचलन बंद
.....
दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार
विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक नियमित बसफेऱ्या रद्द होणार आहेत. प्रामुख्याने शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता व लक्ष्मी रस्तावरील मार्ग बंद राहू शकतात. तसेच सांयकाळनंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक मार्गांवरील गर्दी वाढते. त्याचा बससंचलनावर परिणाम होतो. बस वेळेवर न पोहचल्याने फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे दिवसभरात सुमारे २५ टक्के फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.

Web Title: Changes in "PMP" operation on Immersion Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.