पुणे गुन्हे शाखेत फेरबदल ; काही पथके बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 02:21 PM2018-12-22T14:21:50+5:302018-12-22T14:44:22+5:30

आठवड्यापूर्वी पोलीस आयुक्तालयात अधिका-यांच्या झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला होता.

changes in Pune Crime Branch; Close some squads | पुणे गुन्हे शाखेत फेरबदल ; काही पथके बंद

पुणे गुन्हे शाखेत फेरबदल ; काही पथके बंद

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून केल्या होत्या सुरु अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक पोलीस आयुक्त कार्यालयातच राहणार गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी या साठी आयुक्तांनी गुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल

पुणे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. तर शाखेची काही पथके देखील बंद करण्यात आली असून तेथील अधिकारी कर्मचा-याची इतरत्र बदली झाली आहे. गुन्हे शाखेमध्ये युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५ तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक, होमिसाईड पथक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा विभाग, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाची दोन पथके (गुंडा स्क्वाड), वाहन चोरी विरोधी पथक अशी तेरा पथके होती. गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी या साठी आयुक्तांनी गुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सुरु केल्या होत्या. आठवड्यापूर्वी पोलीस आयुक्तालयात अधिका-यांच्या झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार हा फेरबदल करण्यात आला आहे. 
    बरखास्त करण्यात आलेल्या पथकातील पोलिसांना सध्या अस्तिवात असलेल्या युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५,  खंडणी विरोधी पथक, भरोसा सेल या मध्ये सामावून घेतले आहे. बदली करण्यात आलेल्या अधिका-यांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात जुने ठिकाण) : राजेंद्र कदम (दरोडा विरोधी पथक) युनिट १, गजानन पवार (युनिट २) युनिट २, दिपक निकम (प्रॉपर्टी सेल) युनिट ३, अंजुम बागवान (एओसीसी उत्तर) युनिट ४, दत्तात्रय चव्हाण (युनिट ५) युनिट ५, रघुनाथ जाधव (खंडणी विरोधी पथक) खंडणी विरोधी पथक, विजया कारंडे (महिला सहाय्य कक्ष) भरोसा सेल, स्वाती सुधीर थोरात (अमली पदार्थ विरोधी पथक) ज्येष्ठ नागरिक कक्ष, दीपक लगड (वाहनविरोधी पथक) प्रिव्हेन्टिव्ह बँच, गिता दोरगे (एमओबी) एम ओ बी, क्रांती पवार (प्रशासन, गुन्हे शाखा) प्रशासन, गुन्हे शाखा), वियज टिकोळे (युनिट २) तांत्रिक विश्लेषण, सुनिल दोरगे (अमली पदार्थ विरोधी पथक) अमली पदार्थ विरोधी पथक), मनिषा झेंडे (सामाजिक सुरक्षा) सामाजिक सुरक्षा.
...................
कार्यक्षेत्रातच युनिटची कार्यालये : 
युनिट १ चे कार्यालय पोलीस आयुक्तालयाच्या आवारात असून युनिट २ चे कार्यालय सोमवार पेठ पोलीस वसाहत, युनिट ३ चे कार्यालय पौड रोडवरील अंटी गुंडा स्कॉडच्या कार्यालयात, युनिट ४ चे कार्यालय खडकीतील रेंजहिल येथे, युनिट ५ चे कार्यालया मेगा सेंटरशेजारी असणार आहे. अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक पोलीस आयुक्त कार्यालयातच राहणार आहेत.

Web Title: changes in Pune Crime Branch; Close some squads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.