‘आयसीएसई‘च्या वेळापत्रकात बदल
By Admin | Published: January 14, 2017 03:46 AM2017-01-14T03:46:27+5:302017-01-14T03:46:27+5:30
कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने दहावी (आयसीएसई) व बारावी (आएससी) वेळापत्रकांमध्ये बदल
पुणे : कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने दहावी (आयसीएसई) व बारावी (आएससी) वेळापत्रकांमध्ये बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १० मार्चपासून, तर बारावीची एक मार्चपासून सुरू होईल.
‘सीआयएससीई’ने पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड व उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे स्पष्ट केले आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार होत्या. सुधारित वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा एक मार्चपासून सुरू होईल. या दिवशी भौतिकशास्त्र विषयाची पेपर असेल. तर, दहावीची परीक्षा १० मार्चपासून सुरू होणार असून इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असेल. प्रात्यक्षिक परीक्षांना ३० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. दहावीची परीक्षा २१ एप्रिलला, तर बारावीची २६ एप्रिलला संपेल. (प्रतिनिधी)