महाळुंगेतील शिवजयंती उत्सवात यंदा बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:19 AM2021-02-18T04:19:26+5:302021-02-18T04:19:26+5:30
सोहळ्याच्या कालावधीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या महाराजांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे पूजन व इतर धार्मिक विधी अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. ...
सोहळ्याच्या कालावधीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या महाराजांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे पूजन व इतर धार्मिक विधी अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सम्राट तुपे यांनी दिली.
मागील अनेक वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात संपन्न करण्यात येत असलेला श्री क्षेत्र महाळुंगे येथील शिवजन्मोत्सव सोहळा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार ते शनिवारपर्यंत दोन दिवस विविध सामाजिक बांधिलकी जोपासत समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
तसेच शनिवारी दि.२०/२/२०२१ रोजी स. १० ते सायं. ५ वाजेपर्यंत श्री समर्थ सद्गुरू श्रीपतीबाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी ज्यात दात, कान, नाक आणि साधारण आजाराचे निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सोहळ्यादरम्यान दैनंदिन धार्मिक विधी व इतर सामाजिक कार्यक्रम शासनाने दिलेल्या कोरोनाकाळाचे नियम पाळून करण्याचा निर्णय श्रीक्षेत्र महाळुंगे ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.
श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व स्थानिक नागरिकांना विनंती करण्यात आली आहे, की सर्वांनी या भक्तिमय शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.