मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली ठेकेदारात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 01:05 AM2019-08-18T01:05:40+5:302019-08-18T01:06:04+5:30
कंपनीने उर्से आणि सोमाटणे येथील टोल प्लाझावर ३० ते ४० स्थानिक तरुणांना रोजगार दिल्याचे म्हटले आहे.
पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोलवसुलीची आयआयबीची (इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि) मुदत संपुष्टात आल्याने टोल वसुलीचे काम सहकार ग्लोबल लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे.
एमएसआरडीसीने (महाराष्टÑ स्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यासाठी नुकतेच टेंडर काढले होते. यामध्ये आयआरबीसह सहकार ग्लोबल आणि अन्य तीन कंपन्यांनी टेंडर भरले होते. सर्वाधिक किंमतीची निविदा असल्याने सहकार ग्लोबलला हे काम मिळाले आहे. त्याप्रमाणे कंपनीने टोलवसुलीला सुरूवातही केली आहे. तीन महिन्यांसाठी हा करार आहे.
आॅगस्ट २००४ मध्ये एमएसआरडीसी आणि आयआरबीमध्ये करार झाला होता. त्यानुसार पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पुणे- मुंबई राष्टÑीय महामार्ग क्रमांक ४ (जुना पुणे- मुंबई रस्ता) यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आल होते. १५ वर्षांची ही मुदत नुकतीच संपली आहे. त्यामुळे तीन महिन्यांसाठी नव्याने टेंडर काढण्यात आले होते. या रस्त्यावर वार्षिक सुमारे एक हजार कोटी रुपयांचा टोल गोळा होतो. या रस्त्यासाठी सुमारे ८हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. महाराष्टÑ शासनाने या टोलची मुदत ३० एप्रिल २०४५ पर्यंत वाढविली आहे. द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग यावरील ८ टोलप्लाझावरून ही टोलवसुली होते.
दरम्यान, या टोलवसुलीचा ठेका घेतलेल्या कंपनीने स्थानिकांना डावलून बाहेरील व्यक्तींना उपठेका दिल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. पुणे मुंबई दरम्यान नव्याने महामार्ग बांधताना बहुतांश मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. यामुळे महामागार्मुळे निर्माण होणाºया रोजगारात स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळणे गरजेचे असल्याची मागणी आहे.
कंपनीने उर्से आणि सोमाटणे येथील टोल प्लाझावर ३० ते ४० स्थानिक तरुणांना रोजगार दिल्याचे म्हटले आहे.