चांदणी चौकातील वाहतुकीत बदल, सेवा रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:44+5:302021-03-13T04:20:44+5:30
पुणे : चांदणी चौक पुलावरून कोथरूड व साताऱ्याच्या दिशेने जाणारा सेवारस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चौकातील वाहतुकीत ...
पुणे : चांदणी चौक पुलावरून कोथरूड व साताऱ्याच्या दिशेने जाणारा सेवारस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चौकातील वाहतुकीत बदल केल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत कळवण्यात आले आहे.
सेवा रस्ता बंद केला तरी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भूगाव, एनडीए आणि कोथरूड रस्त्यावरून येणारी वाहतूक ही चांदणी चौक पुलावरून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्हिबा हॉटेल येथून डाव्या बाजूस वळून महामार्गावरून चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील.
पाषाण व बावधनकडून येणारी वाहतूक चांदणी चौक पुलावर न जाता ती वाहने व्हिबा हॉटेक येथे उजवीकडे वळून हायवेवरून चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने केले आहे.