जहांगीर चौकातून आरटीओकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:05+5:302021-04-15T04:11:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीत जहांगीर चौक ते आर.टी.ओ दरम्यान मेट्रोचे ...

Changes in traffic from Jehangir Chowk to RTO | जहांगीर चौकातून आरटीओकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

जहांगीर चौकातून आरटीओकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीत जहांगीर चौक ते आर.टी.ओ दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि.१४) पुढील आदेश येईपर्यंत या भागात प्रायोगिक तत्वावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. जहांगीर चौक ते आर.टी.ओ चौक हा रस्ता वाहतुकीसाठी सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंतच खुला राहाणार आहे. त्यानंतर मेट्रोच्या कामासाठी रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत हा रस्ता बंद राहाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविली आहे.

नागरिकांनी बंद काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. मंगलदास चौकातून येणा-या वाहनचालकांनी जहांगीर चौकातून डावीकडे वळून अलंकार चौक, पुणे स्टेशन, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच आवश्यकतेनुसार डायव्हरशन केल्यास डावीकडे वळून आय.बी चौक,अलंकार चौक, पुणे स्टेशन, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.

Web Title: Changes in traffic from Jehangir Chowk to RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.