मार्केट यार्डातील वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:30+5:302021-04-18T04:10:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात किरकोळ खरेदी करता नागरिकांची गर्दी होत असल्याने येथील खरेदी पूर्णपणे बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात किरकोळ खरेदी करता नागरिकांची गर्दी होत असल्याने येथील खरेदी पूर्णपणे बंद करण्याची व ठोक खरेदी चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मार्केट यार्डातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वखार महामंडळ चौक ते उत्सव चौक दरम्यानचा शिवनेरी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार १९ एप्रिलपासून १ मेपर्यंत हा बदल करण्यात आला आहे.
वखार महामंडळ चौक ते उत्सव चौक दरम्यानची दोन्ही बाजूकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे.
मार्केट यार्ड येथे ठोक खरेदी चालू ठेवली असल्याने त्याकरिता येणा-या वाहनांकरीता केळी बाजाराचे गेटमधून प्रवेश देण्यात येणार आहे. या वाहनांनी बाहेर पडण्याकरीता मेनगेटमधून बाहेर पडून उजवीकडे वखार चौक व डावीकडे मार्केट यार्ड (उत्सव चौक) असे इच्छितस्थळी जातील. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे.