सारसबाग परिसरातील वाहतुकीमध्ये आज बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:44+5:302021-08-01T04:11:44+5:30
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी शहरातील विविध ठिकाणाहून स्थानिक कार्यकर्ते व राजकीय पक्षाचे नेते ...
पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी शहरातील विविध ठिकाणाहून स्थानिक कार्यकर्ते व राजकीय पक्षाचे नेते सारसबाग येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावेळी वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून वाहतूक शाखेने सारसबाग परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.
जेधे चौकातून सारसबाग चौकाकडे वाहनांना जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी जेधे चौकातून सिंहगड रोडला जाण्यासाठी होल्गा चौक, मित्रमंडळ, सावरकर चौक मार्गे सिंहगड रोडला जावे.
जेधे चौकातील वाय जंक्शन (फ्लॉयओव्हर) वरुन सारसबागेकडे वाहनांना जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. कात्रजकडून सारसबागेकडे जाणार्या वाहनचालकांनी उड्डाणपुलावरुन न जाता होल्गा चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
वेगासेंटर ते सारसबाग पर्यंत ग्रेड सेपरेटरमधून वाहनांना जाण्यास प्रवेश बंद आहे. वेगा सेंटरपासून घाेरपडी पेठ उद्यान,राष्ट्रभूषण चौक पासून हिराबाग चौकाकडून इच्छित स्थळी जावे.
पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहनांना आवश्यकत्तेनुसार दुपारी ३वाजल्यापसून मध्यरात्रीपर्यंत दुहेरी प्रवेश देण्यात येईल. वाहनचालकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.