विसर्जनानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल, प्रमुख १७ रस्ते बंद : पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:54 AM2017-09-05T01:54:41+5:302017-09-05T01:55:31+5:30
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जल्लोषात उद्या (मंगळवारी) श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे.
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जल्लोषात उद्या (मंगळवारी) श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. भाविकांची
गैरसोय होऊ नये आणि मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे.
यासाठी शहरातील प्रमुख सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून, वाहनचालकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे (मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीची सांगता होईपर्यंत)
शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, स्वारगेट),
लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक, नाना पेठ ते टिळक चौक, अलका टॉकीज चौक),
बगाडे रस्ता (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक),
बाजीराव रस्ता (बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज, शनिवारवाडा),
कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे कोपरा, शनिपार),
गणेश रस्ता (दारूवाला पूल ते जिजामाता चौक),
गुरुनानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक),
टिळक रस्ता (जेधे चौक ते टिळक चौक),
शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक),
जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडूजीबाबा चौक),
कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडूजीबाबा चौक),
फर्ग्युसन रस्ता (खंडूजीबाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार),
भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक ते नटराज चौक),
पुणे-सातारा रस्ता (होल्गा चौक ते जेधे चौक),
सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक),
प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक).
नो पार्किंगची ठिकाणे पुढीलप्रमाणे (सकाळी ८ ते मुख्य मिरवणूक संपेपर्यंत)
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन रस्ता, खंडूजीबाबा चौक ते वैशाली यांनी जोडणाºया उपरस्त्यांचे १00 मीटर परिसरात पार्किंगसाठी बंदी करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीनिमित्त बाह्यवळण मार्ग
(रिंग रोड) पुढीलप्रमाणे
कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक-विधी महाविद्यालय रस्ता-सेनापती बापट रस्ता- सेनापती बापट रोड जंक्शन, गणेशखिंड रस्ता-वेधशाळा चौक-संचेती हॉस्पिटल चौक-अभियांत्रिकी महाविद्यालय-आंबेडकर रस्ता- शाहीर अमर शेख चौक-मालधक्का चौक-बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरू रस्ता-संत कबीर चौक-सेव्हन लव्हज चौक-वखार महामंडळ चौक-शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केट यार्ड-सातारा रस्ताने व्होल्गा चौक-सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक-सावरकर चौक-दांडेकर पूल-शास्त्री रस्त्याने-सेनादत्त पोलीस चौकी-अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल-नळस्टॉप
पार्किंगची ठिकाणे
एच. व्ही. देसाई कॉलेज शनिवार पेठ, पुलाची वाडी- नदीकिनारी, पूरम चौक ते हॉटेल विश्व (रस्त्याच्या डाव्या बाजूस), दारूवाला पूल ते खडीचे मैदान (गणेश रस्ता), गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, काँग्रेस भवन (मनपा रस्ता), जयवंतराव टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नारायण पेठ बाजूकडील नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग नारायण पेठ
वाहनचालकांना वळण्यासाठी उपलब्ध रस्ते पुढीलप्रमाणे :
जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक), शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा), मुदलीयार रस्ता (अपोलो टॉकीज), नेहरू रस्ता (संत कबीर चौक), सोलापूर रस्ता (सेव्हन लव्हज चौक), सातारा रस्ता (होल्गा चौक), बाजीराव रस्ता (सावरकर पुतळा चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक), फर्ग्युसन रस्ता (गोखले स्मारक चौक)