सुरक्षा रक्षकावर खूनप्रकरणी आरोपपत्र
By admin | Published: April 27, 2017 05:13 AM2017-04-27T05:13:44+5:302017-04-27T05:13:44+5:30
रोखून पाहत असल्याचा जाब विचारून वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्याविषयी इशारा देणाऱ्या संगणक अभियंता तरुणीचा
पुणे : रोखून पाहत असल्याचा जाब विचारून वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्याविषयी इशारा देणाऱ्या संगणक अभियंता तरुणीचा मारहाण करून आणि केबलने गळा आवळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षा रक्षकावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
भाबेन भराली सैकिया (वय २६, रा. हिंजवडी, मूळ रा. आसाम) असे आरोपीचे नाव आहे. रसिला राजू ओ.पी. (वय २४, रा. हिंजवडी, मूळ रा. केरळ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. २९ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ही घटना घडली. रसिला या इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता होत्या. भाबेन सैकिया हा सुरक्षा रक्षक होता. रसिलाने त्याला तिच्याकडे रोखून पाहण्याबाबत जाब विचारला. त्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रारीचा ई-मेल पाठविते असे म्हटले. त्यामुळे चिडून त्याने रसिला हिला मारहाण केली. हाताने आणि कॉम्प्युटरच्या लॅन केबलने गळा आवळून तिला ठार केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तपास करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. बारूलकर यांच्या न्यायलयात आरोपपत्र दाखल केले आहे.