जमिनीच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाणीचा चौघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:26+5:302021-07-17T04:09:26+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी शिंदे व त्यांची सासू यांना जया गणेश ...

Charges filed against four for abusing and beating over land | जमिनीच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाणीचा चौघांविरोधात गुन्हा दाखल

जमिनीच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाणीचा चौघांविरोधात गुन्हा दाखल

Next

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी शिंदे व त्यांची सासू यांना जया गणेश शिंदे, सुनीता हरीचंद्र शिंदे यांनी येऊन ही जमीन आमची आहे. तुम्ही दगड हलवायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी फिर्यादी शीतल शिंदे यांनी आम्हाला दुसरा रस्ता नाही. आम्ही कसे जायचे असे विचारल्याच्या कारणावरून जया शिंदे व सुनीता शिंदे यांनी चिडून जाऊन हातात दगड घेऊन शीतल शिंदे यांना मारहाण केली. तसेच आपखुशीने दुखापत केली आहे. फिर्यादीची सासू मध्ये पडली असता तिलाही हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. परत या रस्त्याने यायचे नाही, नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली. शीतल संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जया गणेश शिंदे व सुनीता हरिचंद्र शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जयश्री गणेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. अवसरी खुर्द खालचा शिंदेमळा येथे साधना नवनाथ शिंदे, शीतल संदीप शिंदे यांनी जमिनीचे तार कंपाउंड तोडून व त्या ठिकाणी जागेचे कडेचे दगडी काढून नुकसान केले. फिर्यादी यांनी त्यांना तुम्ही आमचे जमिनीचे तार कंपाउंड तोडून नुकसान कशाला करता. असे म्हणत असताना त्यांनी ही जमीन व रस्ता आमचा आहे, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. सासू सविता यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकी देऊन दोघी निघून गेल्या. याप्रकरणी जयश्री गणेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी साधना नवनाथ शिंदे व शीतल संदीप शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास मंचर पोलीस करत आहेत.

Web Title: Charges filed against four for abusing and beating over land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.