मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा गुंतवणूकदारांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:45+5:302021-04-18T04:09:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेले मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांनी स्वत:वर गोळी झाडून ...

Charges filed against two investors for inciting Marathe to commit suicide | मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा गुंतवणूकदारांवर गुन्हा दाखल

मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा गुंतवणूकदारांवर गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेले मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मराठे ज्वेलर्स येथे गुंतवणूक केलेले पैसे परत मागण्यासाठी धमकावून मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दीप्ती सरोज काळे (रा. बावधन, उत्तमनगर) आणि नीलेश उमेश शेलार (रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी बळवंत मराठे यांच्या पत्नी निना बळवंत मराठे (वय ६०, रा. रुपाली सोसायटी, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली. हा प्रकार २०१८ ते १५ डिसेंबर २०२० दरम्यान घडला.

मराठे ज्वेलर्समध्ये अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांचे पैसे परत न करता मराठे यांनी फसवणूक केली. कोथरुड पोलीस ठाण्यात मराठे यांच्या कुटुंबातील ५ जणांविरुद्ध १ कोटी ५ लाख ८० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गेल्या महिन्यात दाखल झाला आहे.

निना मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मराठे ज्वेलर्स येथे गुंतवणूक केलेले पैसे परत मागण्यासाठी काळे व शेलार यांनी वेळोवेळी त्यांच्या घरी तसेच दुकानावर येऊन शिवीगाळ व धमकी देऊन तसेच फोनद्वारे देखील वारंवार वाईट भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची धमकी दिली. असभ्य भाषेत बोलून त्यांचा अपमान केला. त्यांना शिवीगाळ करून मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन फिर्यादीचे पती बळवंत मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Charges filed against two investors for inciting Marathe to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.