गोमांस वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:16+5:302021-09-26T04:13:16+5:30
रियाजऊद्दीन मेहकू खान, सध्या रा. माजीवाडा ब्रिजचे खाली झोपडपट्टी ता. जि. ठाणे, मूळ रा. शंकरपूर बहिराज उत्तर प्रदेश ...
रियाजऊद्दीन मेहकू खान, सध्या रा. माजीवाडा ब्रिजचे खाली झोपडपट्टी ता. जि. ठाणे, मूळ रा. शंकरपूर बहिराज उत्तर प्रदेश व गणेश (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद गोरक्षरक्षक???? कृष्णा प्रताप माने, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे याने दिली आहे.
याबाबत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानद पशु कल्याणधिकारी शिवशंकर स्वामी यांना संगमनेर येथुन मिनी आयशर टेम्पो एम एच ०४ जेयू ०१५६ या टेम्पोमध्ये गोमांस भरून पुणे-नाशिक रोडने मुबंईकडे जाणार आहे, अशी बातमी मिळाली असता गोरक्षक कृष्णा माने व त्याचे सहकारी यांनी नारायणगाव पोलिसांच्या मदतीने पाटे - खैरे मळा चौकात पुणे-नाशिक हायवे बाह्य वळणाच्या रोडवर टेम्पोमध्ये गोमांस कोणताही परवाना नसताना गोमांस कापणे, वाहतूक करणे बंदी असतानाही ६ लाख ७५ किंमतीचे अंदाजे ४ हजार ५०० किलो वजनाचे गोमांस मिनी आयशर टेम्पो मधून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने दोघांवर नारायणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे ,सनील धनवे ,संतोष दुपारगुडे, सातपुते, नवीन अरगडे व गोरक्षक गणेश शिंदे , राहुल शिंदे, शुभम दळवी ,कृष्णा माने,अनिकेत चिकले, सूरज चव्हाण, सिद्धेश पडघम, सागर डोंगरे, सागर शिंदे, हर्षल बोऱ्हाडे, ओम जाधव, गणेश थोरात, किरण चव्हाण , ओमकार नायकोडी,मनीष तलवार, ऋषी जंगम, सूर्यकांत शिंदे, प्रकाश कबाडी इत्यादी गोरक्षक यांनी केली आहे.