चार्जिंग स्टेशनला पोलिसांची परवानगी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:45+5:302021-07-21T04:09:45+5:30
भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ई बाईक्सचा भाडेदर १४९ किमी पर्यंत प्रति किमी ला ४ रुपये राहणार आहे़ ...
भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ई बाईक्सचा भाडेदर १४९ किमी पर्यंत प्रति किमी ला ४ रुपये राहणार आहे़ तर १५० किमी ला ३ रुपये प्रति किमी असा असणार आहे़ तर पुढे एक हजार किमी ला १ रुपये ९० पैसे असा भाडेआकार कमी होणार असून, ४ हजार किमीसाठी केवळ ९५ पैसे इतका भाडेआकार ठेवण्यात आला आहे. मात्र यासाठी कालमर्यादा घालून देण्यात आली आहे.
------------------
चार्जिंग स्टेशनला पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक
शहरात ई-बाईक पुरविणाऱ्या कंपन्यांना महापालिका प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत़ यात पार्किंग अथवा चार्जिंग स्टेशनच्या जागा मुख्य रस्त्याच्या कडेला अर्बन स्ट्रीट गाईडलाईन नुसार सायकल ट्रॅक सोडून व फुटपाथवरील वॉकिंग झोन मधील किमान २ मी. रुंदीस बाधा येणार नाही़ जी जागा निवडली जाईल त्याला वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल. भविष्यात जागा बदल करावा लागल्यास होणारा खर्च संबधित कंपन्यांना करावा लागेल. तसेच योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक निकषानुसार दुरूस्ती करण्याचे सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना राहणार आहेत़
-------------------------