दान, तप आणि यज्ञ सांस्कृतिक जीवनाचे आदर्श : मंगला गोडबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:34+5:302021-03-08T04:12:34+5:30

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वानंदी क्रिएशनतर्फे तपस्या पुरस्कार वितरण सोहळा शनिवार (दि. ६) आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार वितरण ...

Charity, penance and sacrifice are the ideals of cultural life: Mangala Godbole | दान, तप आणि यज्ञ सांस्कृतिक जीवनाचे आदर्श : मंगला गोडबोले

दान, तप आणि यज्ञ सांस्कृतिक जीवनाचे आदर्श : मंगला गोडबोले

Next

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वानंदी क्रिएशनतर्फे तपस्या पुरस्कार वितरण सोहळा शनिवार (दि. ६) आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार वितरण गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. वसुधा गोखले, अर्चना कुंडलकर, अलका गद्रे यांना ‘तपस्या पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. गोखले यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांची कन्या तेजस्विनी साठे आणि पुत्र प्रमोद गोखले यांनी स्वीकारला.

गोडबोले म्हणाल्या, मुलांच्या उभारीच्या काळात त्यांच्या कल्पनांना अनेक धुमारे फुटत असतात. त्या काळात संघर्ष न करता त्यांना खंबीरपणे साथ देणे महत्त्वाचे असते. पण ही गोष्ट खूप अवघड असते. एखादे काम वर्षानुवर्षे सौम्यपणे करणे यासाठी एक वेगळ्या प्रकारची मानसिकता, मनोबल लागते. तशा प्रकारचे मनोबल या पुरस्कारप्राप्त महिला दाखवित आल्या आहेत त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आहे.

पुरस्काराला उत्तर देताना अर्चना कुंडलकर म्हणाल्या, एखाद्या कलाकारामागे संपूर्ण कुटुंब उभे असते तेव्हाच तो कलाकार घडतो; मोठा होतो. कलाकार घडविताना सगळेच पालक मेहनत घेतात. पालकांनी मुलांसाठी जरूर मेहनत घ्यावी, त्यांना संधी द्यावी. पुरस्काराच्या मानपत्राचे लेखन वंदना बोकिल-कुलकर्णी यांचे होते.

स्वानंदी क्रिएशनच्या अपर्णा केळकर यांनी मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद केळकर यांनी आभार मानले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुयोग कुंडलकर यांच्या बंदिशी व संत रचना आरती कुंडलकर आणि अपर्णा केळकर यांनी सादर केल्या. सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), कौशिक केळकर (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य), प्रथमेश देवधर (पखवाज) यांनी साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांनी केले.

Web Title: Charity, penance and sacrifice are the ideals of cultural life: Mangala Godbole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.