सनद वाटप हा अभिनव उपक्रम : सुनील कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:14+5:302021-09-24T04:13:14+5:30
वाळुंज ग्रामस्थांना मिळाली प्राॅपर्टीची सनद गराडे : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या स्वामित्व ...
वाळुंज ग्रामस्थांना मिळाली प्राॅपर्टीची सनद
गराडे : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापन सर्व्हेच्या अंतर्गत सनद वाटप करण्यात येत आहे. यामुळे गावातील तंटे कमी प्रमाणात होतील व बँकदेखील आपल्या प्रॉपर्टी कार्डवर कर्ज वितरित करू शकते. अतिशय चांगला पद्धतीचा हा उपक्रम असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांनी केले.
वाळुंज (ता. पुरंदर) येथील गावाचे सर्वेक्षण करण्यात आले असून, उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली सनद भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.
या योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण कार्यक्रमाची पाहणी सोमवारी केंद्र व राज्य सरकारच्या पथकाद्वारे करण्यात आली. यावेळी या गावाचा अधिकृत नकाशा प्रकाशित करीत प्रातिनिधिक स्वरूपात दत्तात्रय निवृत्ती म्हेत्रे, अर्जुन अनंता चौरे, फकीर कृष्णा इंगळे, सुमन वसंत पवार, शांताराम कृष्णा म्हेत्रे यांना त्यांच्या प्रॉपर्टीची सनद देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे भूमिअभिलेख संचालक तथा जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भूमिअभिलेख उपसंचालक किशोर तवरेज, जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, वरिष्ठ तांत्रिक संचालक समीर दातार, तहसीलदार रूपाली सरनोबत, उपअधीक्षक भूमिअभिलेख पुरंदर विकास गोफणे, सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सर्व्हे ऑफ इंडियाचे एस. त्रिपाठी, पुरंदर तालुका भूमिअभिलेख अधीक्षक विकास गोफणे, मंडलाधिकारी प्रभावती कोरे, तलाठी सोमशंकर बनसोडे, संदीप सोडनवर, भूमापक नानासाहेब कांबळे, प्रीतम बनकर, अनिल नंद, हरिभाऊ गायकवाड, शाकिब शेख, श्रीकांत चिवटे, मुनीर इनामदार, राजेंद्र चिंचकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे, सरपंच कैलास मेहत्रे, ग्रामसेवक विलास बडदे, उपसरपंच योगीता इंगळे, अंकुश इंगळे, नरेंद्र इंगळे, रेश्मा चौरे, सुप्रिया इंगळे, विकास इंगळे, कैलास फ. इगळे, ज्ञानेश इंगळे, प्रशांत मेहत्रे, लक्ष्मण मेहत्रे, राहुल इंगळे, विकास मेहत्रे, योगेश जगताप, रवींद्र इंगळे, श्रीधर इंगळे, शंकर इंगळे, विजय इंगळे, दिनेश इंगळे, शुभम राऊत, प्रकाश इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नियोजन समिती सदस्य रमेश इंगळे यांनी केले, तर प्रास्ताविक पुणे प्रदेशचे भूमिअभिलेख उपसंचालक किशोर तवरेज यांनी केले व आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मानले.
बातमीसोबत फोटो पाठवीत आहे.
फोटो ओळी- वाळुंज (ता. पुरंदर) येथे सनद वाटपप्रसंगी सुनील कुमार, आयुष प्रसाद, एन. के. सुधांशू, एस. त्रिपाठी, किशोर तबरेज, बाळासाहेब काळे, रमेश इंगळे आदी.