चारीच्या निकृष्ट कामाची चौैकशी करा

By Admin | Published: May 11, 2017 04:22 AM2017-05-11T04:22:44+5:302017-05-11T04:22:44+5:30

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान समजल्या जाणाऱ्या ३६ चारीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले

Chatchy's scum is done | चारीच्या निकृष्ट कामाची चौैकशी करा

चारीच्या निकृष्ट कामाची चौैकशी करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरातील शेतकऱ्यांना वरदान समजल्या जाणाऱ्या ३६ चारीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असूनही संबंधित ठेकेदाराचे बिल काढल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. याबाबत महाजन यांनी कामाची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
खडकवासला ३६ चारीची निर्मितीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अद्याप एक थेंबही पाणी मिळू शकले नाही. ३६ चारीतून पाणी मिळावे म्हणून इंदापूर आणि बारामती तालुक्यांतील शेतकरी मागील ३० वर्षांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाला यश मिळाल्याने शासनाने ५ कोटी ७४ लाख रुपये चारीच्या दुरुस्तीसाठी टाकले. मात्र अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामाचे बिल काढल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करताच कार्यकारी अभियंत्यांनी कामाची पाहणी केली. जलसंपदामंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याने चौकशी लावण्यात आली आहे.

Web Title: Chatchy's scum is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.