छत्रपती संभाजी महाराजांच्या 362 व्या जन्माेत्सवानिमित्त पुण्यात मिरवणुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 06:36 PM2019-05-14T18:36:41+5:302019-05-14T18:40:43+5:30
छत्रपती संभाजी महाराजांच्या 362 व्या जन्माेत्सवानिमित्त मराठा सेवा संघातर्फे पुण्यात पहिल्यांदाच मिरवणुक काढण्यात आली.
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या 362 व्या जन्माेत्सवानिमित्त मराठा सेवा संघातर्फे पुण्यात पहिल्यांदाच मिरवणुक काढण्यात आली. शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषाेत्तम खेडेकर, खासदार संजय काकडे, माजी महापाैर प्रशांत जगताप, सुवर्णा निंबाळकर, राजेेंद्र कुंजीर , प्रशांत धुमाळ आदी उपस्थित हाेते.
यावेळी चित्ररथ तयार करण्यात आला हाेता. या रथात बुधभूषण लिहीतानाचे संभाजी महाराज एका चिमुकल्याने साकारले हाेते. तसेच संभाजी महाराजांची मुर्ती पालखीत ठेवण्यात आली हाेती. पालखीतून संभाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या पुढे बॅंड, ढाेल पथक व पारंपारिक मर्दानी खेळ सादर करण्यात आले. मिरवणुकीत भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, काॅंग्रेस नेते अभय छाजेड, नगरसेवक सुशिल मेंगडे आदी सहभागी झाले हाेते. डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ शिराेळे, माजी नगरसेवक दत्ता खाडे, माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.