‘छत्रपती’तर्फे 1800 रूपये पहिली उचल जाहीर

By admin | Published: December 6, 2014 10:43 PM2014-12-06T22:43:25+5:302014-12-06T22:43:25+5:30

छत्रपती कारखान्याने सन 2क्14-15 च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन 18क्क् रुपये पहिली उचल जाहीर केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी दिली.

Chattrapati announces first lift of Rs. 1800 | ‘छत्रपती’तर्फे 1800 रूपये पहिली उचल जाहीर

‘छत्रपती’तर्फे 1800 रूपये पहिली उचल जाहीर

Next
भवानीनगर  : छत्रपती कारखान्याने सन 2क्14-15 च्या गळीत हंगामासाठी  प्रतिटन 18क्क्  रुपये पहिली उचल जाहीर केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष  अमरसिंह घोलप यांनी दिली.
घोलप यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की जिल्हा बँकेने यंदा 2क्8क् रुपये प्रतिक्विंटलप्रमाणो रक्कम उपलब्ध  करून दिली आहे. मात्र, कामगारांचे पगार, ऊसतोडणी वाहतुकीचे पेमेंट, सभासदांसाठी खते, कारखाना प्रोसेससाठी  गंधक, चुना, केमिकल, बारदाना खरेदी, व्यापारी देणो आदी खर्चासाठी कोटय़वधीचा खर्च येतो. हा खर्च रोखीने करावा लागतो. त्यामुळे एफ आरपी देण्यासाठी कमी पडणारी रक्कम केंद्र सरकारकडून आर्थिक मदत आल्यानंतर  व्याजासह अदा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला.
गतवर्षी केंद्र शासनाने बिनव्याजी रक्कम उपलब्ध केल्यानंतर एफआरपी ची रक्कम देणो शक्य झाले. सध्या साखरेचे दर  प्रति¨क्वंटल 245क् र्पयत खाली आले आहेत. काही साखर कारखाने  कारखाने चालू गळीत हंगामात उत्पादित झालेली साखर प्रति¨क्वंटल 24क्क् रुपयांनी विक्री करीत आहेत. सध्या मोलसिस चादर प्रतिटन 4क्क्क्, तर बगॅसचा दर 14क्क् रुपयांर्पयत खाली आले आहेत. गतवर्षी हंगात सुरुवातीला साखरेचा दर 27क्क्  रुपये प्रति¨क्वंटल होता. तर मोलसिसचा दर 49क्क्, बगॅसचा दर 2क्क्क् रुपये  होता व बँकेचा उचल दर 228क् प्रतिक्विंटल होता. त्या वेळी ‘छत्रपती’ने 18क्क् रुपयांप्रमाणो पहिला हप्ता अदा केला आहे. साखरेच्या दरातील घसरण न थांबल्यास बँक साखरेचा मूल्यांकन दर कमी करेल. त्यामुळे  कारखान्यापुढे आणखी पेच निर्माण होण्याची भीती आहे. गतवर्षी च्या तुलनेत साखरेचे दर आणखी 2क्क् रुपयांनी घसरले आहेत. 
गतवर्षी एफआरपीप्रमाणो पैसे देण्यासाठी केंद्र शासनाकडून कारखान्यास 21.39 कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध झाले होते. हा आर्थिक बोजा आहे. त्याची परतफेड पुढच्या वर्षीपासून करावी लागणार आहे. 2क्क्2-2क्क्3 मध्ये उपलब्ध केलेल्या 7.58 कोटी कर्जाची परतफेड अजूनही सुरू आहे. या कर्जापोटी 1.51 कोटी देय आहे.
मागील गळीत हंगामात  आलेला तोटा 17.56 कोटी आहे. यंदा 7 लाख टन उसाचे गाळप करून 2.5क् लाख टन ऊस इतर कारखान्यांना पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी एफआरपीनुसार बिल दिल्यास आणखी 38 केाटी लागतील, ते देण्याची आर्थिक परिस्थिती नाही, असे घोलप म्हणाले.  (वार्ताहर)
 
4सन 2क्13-14 च्या बॅलन्सशीटला 17.56 कोटी रुपये तोटा आहे. गेल्या 4 गळीत हंगामात कारखान्याचा अतिरिक्त ऊस पुरवठा करण्यासाठी 27.5क् कोटी खर्च करावा लागला आहे. 
4यंदाही उपलब्ध असणारा अतिरिक्त  ऊसपुरवठा करण्यासाठी अंदाजे 3.75 कोटी रुपये खर्च होणार आहे. हा तोटा वाढेल. चालू वर्षी चा 7 लाख मे टन उसाचे गाळप गृहीत धरल्यास,11.3क् साखर उतारा पाहता 1  टन उसापासून 113 किलो साखर उत्पादित झाली. 
4आजच्या दराने त्याचे मूल्यांकन 285क् होत आहे. मळी, बगॅस इतर उत्पन्न पाहता एकूण मूल्यांकन प्रतिक्विंटल 31क्क् रुपये होत आहे. उत्पादन खर्च 13क्क् रुपये वजा केल्यास प्रतिटन 18क्क् रुपये शिल्लक राहतात. त्यामुळे एफआरपी पूर्ण करण्यासाठी 4क्क् रुपये कमी पडतात. केंद्र शासनाने अर्थसाहाय्य दिल्याशिवाय ती पूर्ण होणार नाही.
 

 

Web Title: Chattrapati announces first lift of Rs. 1800

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.