चव्हाण करणार ५ कोटी रुपयांचा दावा
By admin | Published: August 17, 2016 01:20 AM2016-08-17T01:20:47+5:302016-08-17T01:20:47+5:30
मांजराला मारहाण केल्या प्रकरणी खोटे आरोप करून विजय नावडीकर यांनी माझी आणि कुटुंबीयांची मानहानी केली आहे. नाहक मनस्ताप पोहोचविल्याबद्दल त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा
पुणे : मांजराला मारहाण केल्या प्रकरणी खोटे आरोप करून विजय नावडीकर यांनी माझी आणि कुटुंबीयांची मानहानी केली आहे. नाहक मनस्ताप पोहोचविल्याबद्दल त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा तसेच पाच कोटी नुकसानभरपाईची नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाल्या, ‘‘यशोधन अपार्टमेंटमध्ये एकूण आठ सदनिका धारक राहतात. १२ डिसेंबर २०१२ रोजी ६ सदनिका धारकांनी सहायक आयुक्त कार्यालय विश्रामबाग येथे नावडीकर यांनी पाळलेल्या ७ ते ८ मांजरांपासून होणाऱ्या त्रासाबद्दल लेखी तक्रार दाखल केली होती. महापालिका अधिकारी, पोलीस, अॅनिमल वेलफेअर आॅफिसर सुप्रिया बोस आणि मनोज ओसवाल यांनी दिलेल्या अहवालात मांजरांमुळे आरोग्याला धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. दबाव टाकण्यासाठी नावडेकरांनी पाच-सहा वर्षांपूर्वी अपघातात अपंग झालेल्या मांजराला मारल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे.