चव्हाण यांच्या आत्महत्येने गुंतागुंत आणखी वाढली

By admin | Published: March 18, 2016 03:20 AM2016-03-18T03:20:56+5:302016-03-18T03:20:56+5:30

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला बुधवारी माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम

Chavan's health has increased his complications | चव्हाण यांच्या आत्महत्येने गुंतागुंत आणखी वाढली

चव्हाण यांच्या आत्महत्येने गुंतागुंत आणखी वाढली

Next

पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र ऊर्फ कुमार देवमहाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला बुधवारी माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांच्या आत्महत्येने वेगळे वळण मिळाले आहे. यामागील सूत्रधार कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
१७ जानेवारीला सकाळी देवमहाराज यांनी आत्महत्या केली होती. चिंचवड देवस्थानची माहिती मागवून देवस्थानविषयी विविध तक्रारी नोंदविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांनी बुधवारी (१६ मार्च) लोणीकंद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. भ्रष्टाचारविरोधी संस्थेच्या लेटरपॅडवर चव्हाण यांनी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करून देवस्थानाची माहिती मिळवली होती. काही विश्वस्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून प्रशासकाची नेमणूक करावी, नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती थांबवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर २५ आॅगस्ट २०१५ रोजी ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी धर्मादाय आयुक्तांना दिले होते.

Web Title: Chavan's health has increased his complications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.