निघोजे-कुरुळी रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:20 AM2018-08-21T01:20:24+5:302018-08-21T01:20:40+5:30

कुरुळी पंचायत समिती गणातील निघोजे-मोई या चार किमी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

The chawl of the Neyojo-Kurali road | निघोजे-कुरुळी रस्त्याची झाली चाळण

निघोजे-कुरुळी रस्त्याची झाली चाळण

googlenewsNext

कुरुळी : कुरुळी परिसरातील निघोजे-मोई व कुरूळी- निघोजे रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा खचलेल्या साईडपट्ट्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी उपसरपंच अमित मुऱ्हे यांनी केली आहे.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने खेड तालुक्यात औद्योगिक क्षेत्रातील व कुरुळी पंचायत समिती गणातील निघोजे-मोई या चार किमी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मोई ते कुरुळी (मुºहे वस्ती) येथून पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे येथील नागरिकांना व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
निघोजे ते मोई या रस्त्यावरून पिंपरी चिंचवड हद्दीत असलेल्या चिखली गावाकडे जाणारी जड मालवाहतुकीची सतत वर्दळ आहे. मोई येथे मोठ्या प्रमाणात क्रशर असल्याने येथे अवजड मालवाहूगाड्यांची वर्दळ असते. त्या मुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे. खड्ड्यांमुळे तसेच त्यात पाणी साचल्याने चालणे व गाडी चालविणे मोठे अवघड झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने कुरुळी, चिंबळी, निघोजे, मोई परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने मोठे व खड्डे झाले आहेत. दोन्ही बाजूने साइडट्ट्याही खचल्या आहेत. यामुळे गाड्या चालविणे मोठे अवघड झाले आहे. मुºहे वस्ती येथून पुणे-राष्ट्रीय महामार्गावर चिंबळी फाट्याकडे येणाऱ्या रस्त्यावर साकव पुलाच्या संरक्षणासाठी असलेल्या लोखंडी अँगलची दुरवस्था झाली आहे. या साकव पुलावर डोंगरेवस्ती येथील पावसाचे पाणीही येत असल्याने या ठिकाणाहून जाणे-येणे अवघड झाले आहे. कुरुळी, मोई, निघोजे परिसरातील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच चंद्रकांत बधाले, अरुण फलके, रमेश गायकवाड, उपसरपंच आशिष येळवंडे, सरपंच शरद मुºहे,अमित मुºहे, संजय मुºहे, संतोष मुºहे, दिलीप मेदनकर आदी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: The chawl of the Neyojo-Kurali road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.