नामांकित गृहप्रकल्पांमध्ये स्वस्तात घरे

By Admin | Published: March 24, 2017 04:26 AM2017-03-24T04:26:25+5:302017-03-24T04:26:25+5:30

शासनाच्या आदेशानुसार एक एकरापेक्षा जास्त जागेवर एखादा गृहप्रकल्प उभारल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला वाढीव

Cheap Homes in Designated Home Projects | नामांकित गृहप्रकल्पांमध्ये स्वस्तात घरे

नामांकित गृहप्रकल्पांमध्ये स्वस्तात घरे

googlenewsNext

सुषमा नेहरकर-शिंदे / पुणे
शासनाच्या आदेशानुसार एक एकरापेक्षा जास्त जागेवर एखादा गृहप्रकल्प उभारल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला वाढीव एफएसआय देण्यात येतो. त्याबदल्यात प्रकल्पातील २० टक्के घरे म्हाडाकडे जमा करण्यात येतात. आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील अनेक नामांकित गृहप्रकल्पांतील सुमारे ४ हजार ७८ घरे म्हाडाकडे जमा झाली असून, लवकरच या घरांचे लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात येईल.
शासनाने महापालिका क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ‘परवडणारी घरे’ याअंतर्गत काही तरतुदी लागू करण्यात आल्या आहे. यामध्ये शासनाने सर्वसमावेशक योजनेअंतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात एक एकर किंवा त्याहून अधिक जागेवर एखादा गृहप्रकल्प उभारल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला वाढीव एफएसआय दोण्याचे धोरण करण्यात आले.
या बदल्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पातील एकूण घरांच्या २० टक्के घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील, यासाठी ३२५ आणि ४४० चौ. फुटांची घरे बांधून म्हाडाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. ही २० टक्के घरे म्हाडाकडे वर्ग केल्यानंतरच संबंधित प्रकल्पाला भोगवटापत्र देण्याचे बंधन संबंधित यंत्रणेवर घालण्यात आले आहे. शासनाने हा अध्यादेश २०१३मध्ये लागू केला. त्यानंतर ज्या बांधकाम व्यावसायिकांना एक एकरापेक्षा अधिक जागेत प्रकल्प मंजूर करून घेतला, त्यांना या नियमानुसार २० टक्के घरे म्हाडाला देणे बंधनकारक करण्यात आले.
याबाबत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे-देशमुख यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांत म्हाडाकडे ४ हजार ७८ घरांची नोंद झाली आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील ३६ बांधकाम व्यावसायिकांनी १ हजार ३८५ घरांचा प्रस्ताव दिला आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ८० बांधकाम व्यावसायिकांना तब्बल २ हजार ६९३ घरांचा प्रस्ताव
दिला आहेत. या घरांचे वाटप करण्यासाठी म्हाडाकडून लवकरच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
या घरांची विक्री करताना शासनाने अ‍ॅन्युअल शेड्यूल रेट (एसआरए)मध्ये जे दर निश्चित केले, त्यानुसार या घरांचे दर निश्चित करण्यात येणार असल्याचे काकडे-देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना म्हडाच्या प्रकल्पाशिवाय शहराच्या प्रमुख भागामध्ये व नामांकित, सर्व सोयीसुविधा असलेल्या प्रकल्पांमध्ये स्वस्तात घरे मिळणार आहेत.

Web Title: Cheap Homes in Designated Home Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.