बँक अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक
By admin | Published: June 13, 2015 11:48 PM2015-06-13T23:48:18+5:302015-06-13T23:48:18+5:30
बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून खातेदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून परस्पर बँकेतून पैसे काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी पिंपरी येथे उघडकीस आला.
पिंपरी : बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून खातेदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून परस्पर बँकेतून पैसे काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी पिंपरी येथे उघडकीस आला.
हनुमान इंगळे (वय ५७, रा. पाथरी, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास इंगळे यांना एक फोन आला. बँकेतून बोलत असल्याचे भासवत इंगळे यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. एटीएम कार्डचा पिन क्रमांक विचारला. गोपनीय असलेला हा क्रमांक इंगळे यांनी संबंधित व्यक्तीला सांगितला. ही माहिती विचारून घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीने इंगळे यांच्या खात्यातील १ लाख ३० हजार रुपये काढून घेतले. (प्रतिनिधी)