प्रवेश देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Published: May 23, 2017 05:36 AM2017-05-23T05:36:23+5:302017-05-23T05:36:23+5:30
शहरातील नामवंत खासगी महाविद्यालयात एम.बी.बी.एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका विद्यार्थिनीची १५
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील नामवंत खासगी महाविद्यालयात एम.बी.बी.एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका विद्यार्थिनीची १५ लाख रुपयांची फसवणूक करुन ५ वर्षे गुंगारा देणा-या मध्यस्तास त्या महिलेने नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
शुक्रवार पेठेत राहणा-या २४ वर्षीय तरुणीने फिर्याद केली आहे. त्या सध्या बीएचएमएस फॅकल्टीमध्ये शिकत आहेत. अमित मांडकचंद कासलीवाल (वय ३९, गंगा कार्नेश, कोरेगाव पार्क) याच्यावर मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. त्याला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या विद्यार्थीनीला एम.बी.बी.एस.मध्ये प्रवेश हवा होता. कासलीवाल हा स्क्रॅप विकत घेण्याचा व्यवसाय करत होता. त्याने तरुणीचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी पैसे मागितले. सुरुवातीला तीन ब्लँक चेक घेऊन २०१० पासून २०१२ पर्यंत वेळोवेळी १५लाख रुपये घेतले. नंतर प्रवेश मिळू शकत नसल्याचे सांगून पैसे परत देण्याचे अमिष दाखविले. ५ वर्षे तो गायब होता. कोरेगाव पार्क भागात एका हॉटेलजवळ तो दिसल्यानंतर या तरुणीने नागरिकांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
लग्नाच्या अमिषाने बलात्कार करणाऱ्यांना कोठडी
लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये आरोपींंना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. एका प्रकरणात आतिक तैय्यब शेख (वय २०, रा. पवननगर, अप्पर डेपो) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून आरोपीने पिडीत मुलीवर अत्याचार केले, तिला लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. बाहेरगावी पळवून नेवून शारिरिक संबंध ठेवले. हा प्रकार कोणाला सांगू नये, अशी धमकी दिली.अन्य प्रकरणात सागर शिवाजी शिंदे (वय २३, रा. मु पो. गारडी) याला हडपसर पोलिसांनी अटक केली .