टेंडर देण्याच्या आमिषाने फसवणूक
By admin | Published: December 26, 2016 03:38 AM2016-12-26T03:38:50+5:302016-12-26T03:38:50+5:30
एसबीआय बँकेचे एटीएम सेंटरचे टेंडर आणि मोकळ्या जागेवर बांधकाम करून देण्याच्या बहाण्याने ३३ लाख ३५ हजार रुपयांना
पुणे : एसबीआय बँकेचे एटीएम सेंटरचे टेंडर आणि मोकळ्या जागेवर बांधकाम करून देण्याच्या बहाण्याने ३३ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे़ रमेश चंपालाल सुतार (वय २७, रा़ पाली, राजस्थान) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी तीन आरोपींना अटक केली आहे.
विशाल विष्णू देवकर (वय २९, रा़ आळंदी, भोसरी रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे़ हा प्रकार १२ फेब्रुवारी २०१४ ते २२ एप्रिल २०१४ दरम्यान विश्रांतवाडी येथे घडला. रमेश सुतार विंटेज क्रिएटिव्ह डिझाइन या कंपनीत भागीदार आहे, तर यापूर्वी अटक केलेला हिराचंद सोळंकी त्या कंपनीचा सीईओ आहे.