दुप्पट बिटकाईन करुन देण्याच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:47+5:302021-05-16T04:10:47+5:30

पुणे : बिटकाईनमध्ये गुंतवणूक केल्यास एक महिन्यात दुप्पट करुन देतो, असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल ...

Cheating on the lure of double bitcoin | दुप्पट बिटकाईन करुन देण्याच्या आमिषाने फसवणूक

दुप्पट बिटकाईन करुन देण्याच्या आमिषाने फसवणूक

Next

पुणे : बिटकाईनमध्ये गुंतवणूक केल्यास एक महिन्यात दुप्पट करुन देतो, असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

संजय ऊर्फ संजू लक्ष्मण अवघडे (रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन लक्ष्मण कारी (रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन हे छायाचित्रकार आहे. अर्जुन व संजय हे मित्र आहेत. अवघडे हा शेअरमध्ये गुंतवणुक करायचा. त्याने अर्जुन याला बिटकाईनमध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार अर्जुन याने त्याच्याकडील दोन बिटकाईन अवघडे याच्या क्रिप्टो वॉलेटवर वर्ग केले. त्यानंतर त्याने अद्याप दोन बिटकाईनचे चार बिटकाईन करुन दिले नाही. तसेच मुळ दोन बिटकाईनही परत न दिल्याने शेवटी अर्जुन याने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Web Title: Cheating on the lure of double bitcoin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.