ओएलएक्सवर जाहिरात देऊन एकाची फसवणूक
By admin | Published: March 9, 2017 11:24 PM2017-03-09T23:24:01+5:302017-03-09T23:24:01+5:30
ओएलक्स' या संकेस्तस्थळावर मोटार विक्रीची जाहीरात देऊन सहा जणांनी एका तरुणाची 5 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक
Next
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 9 - ओएलक्स' या संकेस्तस्थळावर मोटार विक्रीची जाहीरात देऊन सहा जणांनी एका तरुणाची 5 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी निरज मेहरा (वय 27, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी त्यांनी वाकड पोलिसांत संतोष कुमार सिंग (उत्तर प्रदेश), खोरा पुई (दिल्ली), कृष्णाप्पा पी याच्यासह इतर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीरज मेहरा यांना नवीन मोटार खरेदी करायची होती. आरोपींनी मोटार विक्रीची जाहीरात ‘ओएलएक्स’वर दिली होती. निरज मेहरा यांनी आरोपींशी संपर्क साधला. समोरील व्यक्ती आणि निरज यांच्यामध्ये साडेपाच लाख रुपयांमध्ये व्यवहार झाला.
आरोपींनी मोटार पुणे, विमानतळावर असून सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांच्या ताब्यात आहे. त्यांना 32 हजार रुपये देऊन ती सोडवून घ्या, असे दूरध्वनीवरून नीरज यांना सांगितले. नीरज यांनी बोगस सीमा शुल्क अधिकारी संतोष कुमार सिंग याच्या खात्यावर 20 सप्टेंबरला 32 हजार रुपये जमा केले.
ओएलएक्सवर जाहिरात देणा-यांनी पुन्हा नीरज यांच्याशी संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. नीरज यांनी खोरो पुई याच्या बँक खात्यात 21 सप्टेंबर 2016 रोजी तब्बल पाच लाख 15 हजार रुपये जमा केले. त्यानंतर विमानतळावर गाडी घेण्यासाठी नीरज तेथे गेले. मात्र, विमानतळावर अशा नावाचे कुणी सीमा शुल्क अधिकारी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निरज यांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींविरोधात फिर्याद दिली.