ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांची तपासणी करा

By admin | Published: December 27, 2016 03:07 AM2016-12-27T03:07:07+5:302016-12-27T03:07:07+5:30

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांमध्ये अनियमितता व त्रुटी दिसून येत असून या खात्यांची योग्य तपासणी करा, अशा सूचना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी

Check the bank accounts of the Gram Panchayats | ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांची तपासणी करा

ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांची तपासणी करा

Next

पुणे : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांमध्ये अनियमितता व त्रुटी दिसून येत असून या खात्यांची योग्य तपासणी करा, अशा सूचना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी केल्या आहेत. तसे पत्रच त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींची ग्रामनिधी व सर्वसाधारण खाती तसेच इतर योजनांची खाती ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्रामपंचायत हद्दीतील शाखेत असतात. या खात्यावर आर्थिक व्यवहार हे ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त स्वाक्षरीने होतात, याची वेळोवेळी तपासणी होते.
अनेक उणिवा निदर्शनास येत आहेत. मात्र, त्यावर आपणाकडेने योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित असते. मात्र आपण किंवा विस्तार अधिकाऱ्याकडून योग्य ती कार्यवाही होत नाही, असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यापुढे योग्य बाबींची खातरजमा करून तपासणी करताना वरील मुद्द्यांची प्राधान्याने तपासणी करा, अशा सूचना माने यांनी दिल्या आहेत. (वार्ताहर)

अशी होते आर्थिक अनियमितता
धनादेश रेखांकित असताना ते संबंधित व्यक्तीच्या खात्यावर जमा न करता रोख रक्कम काढणे, धनादेश अरेखांकित पद्धतीने काढून रोख रक्कम हाताळणे, धनादेशावर खाडाखोड करून तो बँकेत सादर करून पारित करून घेणे, जुन्याच ग्रामसेवकाच्या नावाने व्यवहार चालविणे, ग्रामसेवकाच्या बदलीनंतर पदभार योग्य पद्धतीने हस्तांतरित न करता धनादेश सुपूर्द न करता ते काही काळानंतर वापरून रकमेचा अपहार करणे.

Web Title: Check the bank accounts of the Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.