शालेय पोषण आहाराची होणार तपासणी
By admin | Published: December 7, 2014 12:22 AM2014-12-07T00:22:50+5:302014-12-07T00:22:50+5:30
पालिकेच्या शाळांतील शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र तपासणी पथके स्थापन करण्यात येणार आहेत.
Next
पुणो : पालिकेच्या शाळांतील शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र तपासणी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. ही पथके आठवडय़ातून एकदा या आहार, तसेच ते पुरविणा:या संस्थांच्या कामाचीही तपासणी करणार आहेत.
याबाबत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी तातडीचे आदेश देऊन याबाबतचे पत्र सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सायंकाळी उशिरा पाठविण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मंगळवार पेठेतील रवींद्रनाथ टागोर शाळेत माध्यान्ह भोजनातून सुमारे 65 मुलांना विषबाधा झाल्यानंतर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला. भविष्यात अशा प्रकारांवर त्यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे.
टागोर शाळेत गुरुवारी दुपारी चौथी ते सातवीच्या 85 मुलांना माध्यान्ह भोजन दिल्यानंतर त्यातील 65 मुलांना चक्कर, उलटय़ा, तसेच जुलाबाचा त्रस झाला. त्यातील 19 मुलांना जास्त त्रस होत असल्याने या मुलांना पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या घटनेमुळे पोषण आहाराच्या दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र तपासणी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्या पुढील आठवडय़ात स्थापन करण्यात येणार असून, त्यांच्याद्वारे तत्काळ तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली. (प्रतिनिधी)
अशी असेल समिती
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्थापन करण्यात येणा:या या समितीत सहायक महापालिका आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, सहायक शिक्षणप्रमुख, नागरवस्ती विभागाचा समाजसेवक असणार आहेत. ही समिती पालिकेच्या शाळांमध्ये आहार पुरविणा:या 15 सेंट्रल किचनची दर आठवडय़ास तपासणी करेल. याशिवाय या आहारात वापरले जाणारे धान्य, किचनची स्थिती, आहारासाठी वापरली जाणारी भांडी, वाहतूक केली जाणारी भांडी, आहार मुलांना देताना, तसेच बनविताना पाळले जाणारे स्वच्छतेचे निकष यांची तपासणी करेल. तसेच या तपासणीचा अहवाल प्रत्येक महिन्यास महापालिका आयुक्त, तसेच अतिरिक्त आयुक्त यांना दर महिन्यास सादर करेल.