पुण्यात सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये धूर; अग्निशामक दल आणि एनसीएल चे पथक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 15:24 IST2021-03-29T15:16:20+5:302021-03-29T15:24:18+5:30
परिस्थितीवर नियंत्रण मात्र कृत्य करणाऱ्याचा शोध सुरू...

पुण्यात सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये धूर; अग्निशामक दल आणि एनसीएल चे पथक दाखल
पुणे : पुण्यातील गरवारे काॅलेजजवळ असणाऱ्या सेंट्रल माॅलच्या पार्किंगमध्ये सोमवारी (दि.२९)दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या केमिकलमधून अचानक धूर येऊ लागल्याने नागरिकांना त्रास जाणवू लागला.यामुळे काहीवेळ उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून धोका दूर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये धूर झाला होता. पांढऱ्या रंगाच्या केमिकल मधून धूर बाहेर पडत होता तसेच बुडबुडे देखील येत होते.
मात्र परिस्थिती नियंत्रणात असली तरी नेमके कुठले केमिकल होते याचा अद्याप तरी तपास लागलेला नाही. मात्र, नागरिकांना श्वास घेताना प्रचंड खूप त्रास जाणवत होता.
काहीवेळापूर्वीच एनसीएलच्या टीम ला देखील पाचारण करण्यात आले आहे. हे केमिकल सेंट्रल मॅालच्या टीमपैकी कोणी ठेवले नसल्याचा दावा सेंट्रलच्या मॅनेजमेंटने केला आहे. पण हे कृत्य कोणी केले याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तसेच तपास सुरु आहे.