रासायनिक प्रकल्पातील स्फोटाने अस्वस्थ कुरकुंभ ! अपघाताच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:46 AM2018-01-29T02:46:56+5:302018-01-29T02:47:27+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले.

 Chemical project explosion uncomfortable crunch! Increase in accidents | रासायनिक प्रकल्पातील स्फोटाने अस्वस्थ कुरकुंभ ! अपघाताच्या घटनांत वाढ

रासायनिक प्रकल्पातील स्फोटाने अस्वस्थ कुरकुंभ ! अपघाताच्या घटनांत वाढ

Next

कुरकुंभ - कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील अपघात व प्रदूषणाबाबतची धगधग ही नागरिकांच्या मनात कायम असून वारंवार होणा-या स्फोटाने दहशत दिसून येत आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आॅनर लॅब या कंपनीतील कुलिंग प्लांटला लागलेल्या आगीमुळे उठलेल्या धुराच्या लोटांनी कुरकुंभ पुन्हा एकदा हादरले. दरम्यान, आगीचे स्वरूप जरी कमी असले व त्यातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा अन्य कुठल्याही प्रकारे अनुचित घटना जरी घडली नसली तरी अशी परिस्थिती निर्माण होणेदेखील गंभीर आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक प्रकल्पातील सर्वात मोठे असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपातील रासायनिक कारखाने उभारले गेले आहेत.
परिणामी या मोठ्या कारखान्यांमधून होणारे रासायनिक पाण्याचे व वायूचे प्रदूषणदेखील मोठ्या स्वरूपात आहे. जवळपास दोनशे छोटे-मोठे प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित असून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालदेखील होत आहे. कुरकुंभ येथील नागरिकांचे राहणीमान जरी उंचावले असले तरी त्यासोबत प्रदूषण व रासायनिक प्रकल्पातील स्फोटातील अपघाताने मात्र रोजचे जीवनमान अतिशय दहशतीचे करून टाकले आहे.
अतिशय घातक रसायने, वायू व त्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे येथील पाणी, हवा दूषित झालेले आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष परिणाम येथील नागरिकांच्या जीवनमानात दिसून येतो आहे. वारंवार होणाºया अपघाताने कित्येक कामगारांनी आपला प्राणदेखील गमावला आहे, मात्र तरीही अपघात ही नित्याचीच बाब झाली असल्याचे पाहावयास मिळते. धुरांच्या लोटाने नागरिकांच्या मनात एक प्रकारे दहशत निर्माण झालेली दिसून येते. कारण कुठल्या प्रकरचा वायू हवेतून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, हे सांगणे कठीण असते. अपघाताची गंभीरता मोठी
असल्याने सगळीकडे एकच पळापळ उडते. यामध्ये अफवांचे पेवदेखील फुटतात, त्यामुळे भीतीचे वातावरण आणखीच वाढते.

कामगारांची
सुरक्षा धोक्यातच
घातक प्रक्रिया होत असताना लागणाºया सुरक्षाव्यवस्था या अपुºया आहेत. मोठ्या स्वरूपातील लागलेल्या आगीचे नियंत्रण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. परिणामी जोपर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी येथे पोहोचतात तोपर्यंत होत्याचे नव्हते होऊन जाते. रासायनिक अभिक्रियेत शरीरावर होणारे दुष्परिणाम रोखण्याची यंत्रणादेखील कार्यान्वित नाही, त्यामुळे सामान्य कामगाराचा जीव हा अगदीच सामान्य असल्याची पावतीच मिळते. छोट्या उद्योगातून तर सुरक्षेच्या नावालादेखील जागा नसते. नावाला सुरक्षा उपकरणे असतात, मात्र त्याचा उपयोग किती होतो, यावरच प्रश्नचिन्ह आहेत. एकंदरीतच या ठिकाणाच्या सुरक्षा यंत्रणेलाच सुरक्षा पुरवण्याची गरज भासू लागली आहे.

नियंत्रणे नाहीत
जवळपास हजार एकरपेक्षा जास्त जागेत बसलेल्या या औद्योगिक प्रकल्पात दोनशे उद्योग आहेत, तरीदेखील यांच्यावर नियंत्रण करणाºया यंत्रणा या पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी शहरात असतात. त्यामुळे हे नियंत्रण फक्त नावालाच आहे.

उत्पादनवाढीकडे लक्ष
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये रासायनिक प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घातक रासायनिक प्रयोगांना महत्त्व दिले जाते. ही रसायने अतिशय महाग असल्याने कुठल्याही प्रकारे उत्पादन मिळणे हे अत्यंत गरजेचे असते.
परिणामी एखाद्या वेळेस यांच्या रासायनिक अभिक्रिया करताना निर्माण झालेल्या अडचणी कामगारांना न सांगताच त्यांच्याकडून, तसेच काम करून घेताना बºयाच वेळा अपघात होतात. काही महाभाग तर प्रकल्प पूर्ण होण्याआधीच उत्पादने घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळेदेखील अपघात झाल्याची घटना या ठिकाणी घटलेल्या आहेत.

Web Title:  Chemical project explosion uncomfortable crunch! Increase in accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे