कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:09 AM2019-02-19T00:09:24+5:302019-02-19T00:09:57+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रकार : पाण्याचे नमुने तपासून कारवाई करण्याची मागणी
कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी खासगी टँकरच्या साह्याने रात्रीच्या वेळेस आजवर अनेक डोंगर भागात टाकले जात होते. मात्र आता हे पाणी ग्रामस्थांच्या शेतात टाकण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे कुरकुंभ परिसरात आधीच थोड्याफार प्रमाणात राहिलेली शेती आता पूर्णत: नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे असे कृत्य करणाºया कारखानदारांना शोधण्याचे आव्हान प्रदूषण मंडळ व तत्सम विभागापुढे उभे ठाकले आहे.
कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात अनेक छोटे उद्योग अस्तित्वात असून, यामधील अनेक उद्योगातून निर्माण होणाºया रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचवण्यासाठी कंपनी मालक आजपर्यंत मनमानी पद्धतीने पाणी रात्रीच्या वेळेस कंपनीच्या खाजगी जागेत सोडत असल्याचे आजवर उघड झाले आहे. मात्र आता त्या जागाही पाणी सोडण्याच्या उपयोगास
कमी पडत असून, ग्रामस्थांच्या जागरुकीने पाण्याची विल्हेवाट लावणे अवघड होत आहे.
त्यामुळे खासगीत टँकरला भाडेतत्त्वावर घेऊन हे पाणी दौंड-बारामती रस्त्याच्या दरम्यान
असणाºया वन विभागाच्या जमिनीत सोडले जात होते. याबाबत अनेक वेळा प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र यावर कुठलीच कारवाई आजतागायत करण्यात आली नाही.
रासायनिक प्रकल्पातील अनेक कंपनी समूहाच्या माध्यमातून सांडपाणी सामूहिक प्रक्रिया
केंद्र उभारण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या पाण्यावर ठरावीक मापदंडावर
प्रक्रिया केली जाते मात्र ज्या
कंपनीचे सांडपाणी अतिशय घातक आहे, त्यांना यामध्ये प्रवेश
नाकारला जातो, त्यामुळे अशा
कंपन्या बºयाच वेळा पाणी
उघड्यावर सोडत असल्याच्या
तक्रारी येत असतात. अनेक वेळा प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्षात भेट देऊन वरील सर्व प्रकार पाहिलेला असून आर्थिक संबंध जपण्याच्या प्रचलित पद्धतीने कुठलीच कारवाई केली जात नाही. मात्र याचा प्रत्यक्ष त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना होत आहे.
महामार्गावर टँकर केला जातो रिकामा...
कुरकुंभ येथून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग, औद्योगिक क्षेत्र, बारामती, नगरला जोडणारा मार्ग, तसेच दौंड तालुक्यातील अन्य औद्योगिक वसाहती, तसेच बारामती येथे असणारे उद्योग त्यामुळे परिसरात दळणवळण मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी रस्त्यावर एखादा टँकर थांबला असला तरी त्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही, त्यामुळे अनेक वेळा बिघाड झाल्याच्या नावाखाली टँकर उभा करून गुपचूप सांडपाणी सोडले जाते. मात्र यावर लवकर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ अशा मुजोरपणे प्रदूषण करणाºयांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.