विद्युत इंजिनने धावण्याचा मान चेन्नई-मुंबई-बांद्रा एक्सप्रेसला; मिरज-पुणे मार्गावर रेल्वे पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:35 PM2022-04-07T23:35:30+5:302022-04-07T23:37:05+5:30
पुणे ते मिरज दरम्यानच्या जुन्या लाईनवर विद्युतीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या मध्य परिमंडळाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह या मार्गाची अत्यंत बारकाईने तपासणी केली.
कोरेगाव - मिरज-पुणे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण असून, सोलापूर-पुणे मार्गावर गुरुवारी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे चेन्नई-मुंबई-बांद्रा एक्सप्रेस कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गावरून वळविण्यात आली. कोरेगावला क्रॉसिंगच्या निमित्ताने दोन मिनिटे तिने थांबा घेतला. पण, पहिल्यांदाच धावलेल्या इलेक्ट्रिक रेल्वेला पाहण्यास प्रवाशांनी गर्दी केली होती.
पुणे ते मिरज दरम्यानच्या जुन्या लाईनवर विद्युतीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या मध्य परिमंडळाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह या मार्गाची अत्यंत बारकाईने तपासणी केली. पुणे ते मिरज दरम्यानच्या जुन्या लाईनवर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या तपासणीमुळे मिरज -पुणे दरम्यान विद्युत इंजिनद्वारे रेल्वे सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता कोरोना काळानंतर मध्य रेल्वेने आपल्या सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्याने या सेवा कार्यान्वित होत आहेत.
याचदरम्यान सोलापूर-पुणे दरम्यान रेल्वे मार्गावर गुरुवारी ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे चेन्नई-मुंबई-बांद्रा एक्सप्रेस ही कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गावरून वळविण्यात आली होती. मिरजेवरून ती दुपारी सव्वाच्या सुमारास मुंबईकडे मार्गस्थ झाली. कोरेगावातून दोन चाळीसच्या सुमारास पुण्याकडे धावू लागली. पण, पहिल्यांदाच धावलेल्या इलेक्ट्रिक रेल्वेला पाहण्यास प्रवाशांनी गर्दी केली होती.