छबनराव वाघमारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:24+5:302021-03-30T04:07:24+5:30
गेले अनेक वर्षे ते मधुमेह व त्यानंतर किडनीच्या आजारावर उपचार घेत होते. आज पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात ...
गेले अनेक वर्षे ते मधुमेह व त्यानंतर किडनीच्या आजारावर उपचार घेत होते. आज पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पूर्व हवेली परिसरातील राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असे. पेरणे गावच्या ग्रामपंचायतीवर १९७९ ते २००२ दरम्यान ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व सरपंचाच्या माध्यमातून त्यांनी नेतृत्व केले. तर हवेली तालुका खरेदी विक्री संघावरही उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, स्नुषा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राजेंद्र वाघमारे हे त्यांचे चिरंजीव होत.